शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार सुरू झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 11:37 IST

अंगणवाडी कर्मचारी संप मागे : 15 दिवसांपासून होता ठप्प, बचत गटांचा घेतला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांच्या संपामुळे कुपोषीत बालक, गर्भवती व स्तनदा मातांना देण्यात येणारा पुरक पोषण आहाराचा गेल्या 15 दिवसांपासून खंडित झालेला पुरवठा अखेर शनिवारपासून सुरळीत झाला. अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेतला गेल्याने आहार पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.अंगणवाडी कर्मचा:यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. आंदोलन मागे घेतले जाते किंवा नाही याबाबत अनिश्चितता होती. परिणामी अंगणवाडींमार्फत सहा वर्षाआतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आहार पोषण व आरोग्य सेवा विषयीच्या विविध सेवा रखडल्या होत्या. परिणामी संबधितांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता शासनाने चार दिवसांपूर्वी तातडीने अध्यादेश काढून आहार पुरवठा खंडित होऊ नये यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सुचना संबधित जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.जिल्ह्यात हजारो होते वंचितजिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील एक लाख 65 हजार बालके, 26 हजरापेक्षा अधीक गरोदर महिला, स्तनदा माता व किशोर मुली या सेवांपासून वंचीत राहत होत्या. यामुळे सहा वर्षाआतील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवाय गरोदर व स्तनदा मातांना योग्य आहार आणि आरोग्य सेवा वेळेवर पोहचू न शकल्यास मोठी समस्या निर्माण होणार होती. त्यादृष्टीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलली     होती. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिका:यांनी घेतलेल्या नवसंजीवनीच्या बैठकीत देखील याबाबत सुचना दिलेल्या होत्या.आशा सेविकांचा आधार अंगणवाडी कर्मचारी ज्या सेवा पुरवीतात त्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात पुरविण्यासाठी आशा सेविकांचा आधार घेतला जाणार होता.  तसा अध्यादेश चार दिवसांपूर्वी महिला व बालविकास विभागातर्फे काढण्यात आला. या कामासाठी अंगणवाडी सेविकेचा दैनिक मानधनाएव्हढी रक्कम आशा सेविकेला मानधन म्हणून दिली जाणार होती. काही ठिकाणी बचत गटांचा आधार घेण्यात आला होता.परंतु शुक्रवारी सायंकाळी अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात आला. परिणामी शनिवारपासून जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वेळेवर आहार पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषद आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे