लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरीकता संशोधन कायद्याला पाठिंबा देण्यासाठी शहरातील विविध समाज संघटना तसेच व्यापाऱ्यांनी रॅली काढली होती़ याद्वारे सीएएला समर्थन युवकांकडून विविध फलक झळकवण्यात येत होते़ सुमारे दोन तास शहरातील विविध मार्गांवरुन ही रॅली सुरु होती़छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून रॅलीला प्रारंभ करण्यात आला़ यात खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, भाजपाचे जिल्हाधक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक प्रा़ रविंद्र चौधरी, अॅड़ भरत मराठे यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा मंच समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते़ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून प्रारंभ झालेला मोर्चा अंधारे चौक, पालिका चौक, शास्त्री मार्केट, माणिक चौक, गणपती मंदिर, सोनार खुंट या मार्गाने जळका बाजाराकडे मार्गस्थ झाला़ येथून डॉ़आंबेडकर पुतळा व पुढे नवापुर चौफुलीपर्यंत मोर्चा गेला़ विविध घोषवाक्य असलेल्या फलकांसह युवकांकडून घोषणाबाजी सुरु होती़ मोर्चासाठी ग्रामीण भागातून युवक आले होते़ नवापुर चौफुलीपर्यंत आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले़ यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ प्रसंगी बोलताना खासदार डॉ़ हीना गावीत यांनी सांगितले की, सीएए बाबत सर्वत्र गैरसमज पसरवले जात आहेत़ हा कायदा देशातील नागरिकांना जाचक असा असल्याचा अपप्रचार सुरु आहे़ प्रत्यक्षात मानवतेच्या दृष्टीकोनातून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशात राहणाºया विविध धर्मिय नागरिकांना आश्रय देण्यासाठी कायदा निर्मिती केली आहे़ यातून त्यांचे पुनर्वसन होणार आहे़ कायद्याला लोकसभेत उपस्थित राहून समर्थन दिल्याचा अभिमान असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या़सिंधी समाज, माळी समाज, श्री माळी ब्राह्मण समाज, वाणी समाज, तेली समाज, सोनार समाज, भावसार समाज, गवळी समाज, कुंभार समाज, जैन समाज, लोहार समाज, श्रत्रीय सोमवंशी समाज, गुरव समाज, मराठा समाज, नाभिक समाज, कासार समाज, व व्यापारी अशोसिएशन, सराफ बाजार, जळका बाजार व्यापारी, मंगळ बाजार व्यापारी, किराणा मर्चंट व्यापारी, सिंधी कापड मार्केट, भांडी मार्केट व्यापारी, मंगळबाजार व्यापारी कापड असोसिएशन आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे़
रॅलीत ३५० फुटांचा तिरंगा लक्ष वेधून घेत होता़ राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे युवकांनी दोन-दोनच्या रांगेत हा झेंडा धरला होता़ रॅलीत सहभागी युवकांकडूनही तिरंगा झेंडा घेऊन घोषणाबाजी करण्यात येत होती़ रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उपअधिक्षक रमेश पवार हे फौजफाट्यासह नवापुर चौफुलीवर उपस्थित होते़ जिल्हाधिकारी कार्यालयातही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात होता़