शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रभारीराज’मुळे नागरिकांची फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 10:56 IST

तळोदा विभागात अधिकारी मिळेना : नियमित प्रांताधिकारी व प्रकल्पधिका:यांची प्रतिक्षा

ठळक मुद्देप्रांत कार्यालय व आदिवासी विकास प्रकल्प दोन्ही विभाग महत्वाची आहेत मात्र तेथे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत़ त्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत़ जातीच्या दाखल्याकरीता रोज चकरा मारत आह़े शिवाय प्रकल्प कार्यालयात ही कामे होत नसल्याच्या

वसंत मराठे।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील प्रांत कार्यालय अन आदिवासी प्रकल्प कार्यालय या दोन्ही प्रमुख कार्यालयात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका:यांची नेमणूक केली असली तरी ते प्रभारी आहेत़ ते पूर्णवेळ कार्यालयात राहू शकत नसल्याने जनतेची फिरफिर वाढल्याचे चित्र आह़े येत्या काळात विभागातील ग्रामपंचायत व पुढील पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कायम अधिकारी नियुक्तीची मागणी आह़े दोन महत्त्वपूर्ण अधिकारी पूर्णवेळ नसल्याच्या या प्रकाराची दखल महसूल विभागाने घेण्याची गरज आह़े आदिवासी जनतेच्या विकासासाठी व शासनाच्या महसूली सोईसाठी शहरात उपविभागीय अन् आदिवासी विकास प्रकल्प अशी प्रमुख कार्यालय सुरु आहेत़ यात तळोद्यासह अक्कलुकुवा व  धडगाव या सातपुडय़ातील अति दुर्गम तालुक्यांच्या समावेश आह़े मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हे दोन्ही प्रमुख विभाग प्रभारी अधिका:यांवर सुरु असल्याने कामासाठी येण:या नागरिकांची फिरफिर वाढली आह़े तत्कालीन प्रांताधिकारी अभिजीत राऊत यांची एप्रिल महिन्यात बदली झाल्यानंतर आजही कायम अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही़ त्यांच्याजागी बदलून आलेले अमोल कांबळे हे एक आठवडाही आले नाहीत़ रजेवर असतानाच त्यांना सातारा जिल्ह्यात रोहयो अपहार प्रकरणी अटक करण्यात आली आह़े  प्रशासनाने येथे उपजिल्हाधिकारी डॉ अजित थोरबोले यांची नियुक्ति केली आहे  मात्र ते नियमित कार्यालयात राहत नाहीत़ आठवडय़ात तिन दिवस उपस्थित असतात़ जातीचे दाखले व इतर तत्सम कागद पत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारवे लागत आहे यात पैसा व वेळ वाया जात आहेच, तरीही काम होत नसल्याने रिकामे हाताने परत  जावे लागत असल्याची व्यथा आह़े शिवाय आज साहेब नाहीत उद्या येतील, असे सबंधितंकडून सांगितले जात असल्याने निराशाच पदरी पडत़े  वास्तविक तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात ग्रामपंचयत निवडणुका लागल्या आहेत तसेच पुढे तळोदा नगरपालिकेचीही निवडणूक होणार आह़े साहजिकच या पाश्र्वभूमीवर इच्छुक  उमेदवारांची जातीचे दाखले, पडताळणीकरीता लागणारी कागदपत्रे या करिता वर्दळ वाढली आह़े अर्थात प्रांताधिकारी साहेबांना निरोप दिल्या नंतर ते तात्काळ येतात मात्र तेथील कामाच्या व्यापामुळे ते पूर्णवेळ येथे देवू शकत नाही महसूली कामकाजाच्या दृष्टीने पूर्ण वेळ अधिकारी कार्यालयीन स्थळी असणे आवश्यक आह़े त्यातही प्रांत कार्यालय प्रशस्त मध्यवर्ती इमारतीत आह़े शिवाय इतर डझनभर विभाग याच इमारतीत आहेत़ त्यामुळे इतर कर्मचार्यांवर वचक राहत असतो मात्र हा अधिकारी कायम स्वरूपी नसल्यामुळे कर्मचारींचे ही चांगलेच फावले असल्याचे म्हटले जात आह़े दोन्ही पदांवर नियमित अधिकारी नियुक्त करण्याबाबत महसूल विभागाने गांभिर्याने दखल घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े