शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त : खेडदिगर येथील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:19 IST

आंतरराज्य मार्ग गावातून गेल्याने समस्या, उपाययोजनेची गरज

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे आठवडे बाजार व इतर दिवशी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. खेडदिगर गावाच्या बसथांब्याजवळ वाहने व नागरिकांची नेहमी गर्दी असते. गावातून आंतरराज्य मार्ग गेल्याने अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. आठवडे बाजाराच्या दिवशी बसथांबा परिसरात दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खेडदिगर येथे शनिवारी आठवडे बाजार भरतो. यादिवशी इतर दिवसापेक्षा जास्त प्रमाणात गर्दी  होते. परिसरातील गावातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी शनिवारी मोठय़ा प्रमाणात येथे  येतात. तसेच खेडदिगर गावातूनच आंतरराज्य महामार्ग गेल्याने  अवजड वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते.  या वाहनांमुळे वाहतूक ठप्प होऊन इतर वाहनधारकांना नाहक त्रास  सहन करावा लागतो. आठवडे बाजाराच्या दिवशी ही समस्य दिवसभर जाणवते. वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाहन पुढे काढण्याच्या वादातून वारंवार  वादही निर्माण होतात. अवजड वाहनांसह ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टरची संख्या मोठी  आहे. त्यातच हातगाडीवर वस्तू  विक्री करणा:यांची गर्दी असते. रस्त्यावर आपल्या हातगाडय़ा लावून उभे राहत असल्याने वाहतुकीची समस्येत भर पडते. याठिकाणी  पोलीस कर्मचारी नियुक्त केल्याचे सांगण्यात येते. मात्र याठिकाणी पोलीस कर्मचारी दिसून येत नाहीत. वाहतूक ठप्प झाल्यानंतर इतर लोकांना पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करावी लागते. जर  याठिकाणी पोलीस विभागाने कर्मचारी नियुक्त केले असतील तर त्यांनी दिवसभर थांबून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. याठिकाणी कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी व्यावसायिक व त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.