विधी संघर्ष बालकाने पोलिसांसमोर काढून दिला ४६ हजारांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:19 PM2020-02-17T12:19:39+5:302020-02-17T12:19:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईल चोरीचा तपास करत असताना हाती लागलेल्या विधी संघर्ष बालकाने पोलीसांच्या भितीने गर्भगळीत होऊन ...

Child disputes legal issues to police | विधी संघर्ष बालकाने पोलिसांसमोर काढून दिला ४६ हजारांचा मुद्देमाल

विधी संघर्ष बालकाने पोलिसांसमोर काढून दिला ४६ हजारांचा मुद्देमाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोबाईल चोरीचा तपास करत असताना हाती लागलेल्या विधी संघर्ष बालकाने पोलीसांच्या भितीने गर्भगळीत होऊन थेट दुचाकीसह ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून देत चोरीची कबुली दिली़ एलसीबीचे पथक शहादा शहरातील मोबाईल दुकानाच्या चोरीचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा माग काढण्यात यश आले होते़
शहादा येथील काशिनाथ भाजीपाला मार्केट येथे टेकसिटी मोबाईल दुकान अज्ञात चोरट्याने फोडल्याने १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले होते़ चोरट्याने १८ हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरुन नेली होती़
या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची एलसीबीच्या पथकाने तपासणी केली असता, अज्ञात चोरटा दुकानात प्रवेश करत असल्याचे दिसून आले होते़ याप्रकरणी शहादा पोलीसात गुन्हा दाखल होता़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी याचा तपास सुरु केला होता़ दरम्यान पोलीस निरीक्षक नवले यांच्यासह पथकाने शहाद्यात तपास सुरु केला होता़ दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरटा पहाटे अज्ञात चोरटा शहादा अमरधाम परिसरात लपून असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यांनी तातडीने पथकासह तेथे भेट देत चोरट्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले होते़
दरम्यान त्याची चौकशी करण्यापूर्वीच ‘मारु नका मी सगळं सांगतो’ असा गयावया करत पोलीसांसमोर ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, २ हजार ८०० रुपये रोख, ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल काढून दिला़ अल्पवयीन असलेल्या विधी संघर्ष बालकाने शहादा शहरातच आठ ते नऊ ठिकाणी चोरी केल्याची माहिती समोर आली असून दोन गुन्हे उघडकीस आले असल्याचे सांगण्यात आले आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल दिपक गोरे, पोलीस नाईक विकास अजगे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली़

Web Title: Child disputes legal issues to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.