बोरद : वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागाकडे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजने १ हजार १०० शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत़ या अर्जांवर कामकाज सुरु असताना अर्ज करणारे ७०० वनपट्टेधारक शेतकरी या योजनेपासून मुकणार आहे़ सातबारावर विहिर किंवा कृषीपंपाच्या जोडणीची नोंद नसल्याने त्यांचे अर्ज बाद ठरवले जात आहेत़शहादा, धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या चार तालुक्यातून ७०० वनपट्टेधारक शेतकºयांनी कृषी सौरपंपांसाठी अर्ज केले होते़ शासनाकडून मिळालेल्या वनपट्ट्यांचे सिंचन करुन त्यातून उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता़ परंतू या प्रयत्नात शासनाच्या नोंदीं अडथळा ठरत आहेत़ कृषीपंप आणि विहिरींची नोंदी वनपट्टेधारकांना देण्यात आलेल्या सातबारांवर नोंद नाही़ यामुळे हे शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत़ यावर मार्ग काढण्यासाठी शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता किसन पावरा यांनी जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांना माहिती देत नोंदी करण्याचे सुचवले होते़ त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चारही तहसीलदारांना सातबारावर नोंद करण्याचे आदेश काढले होते़ यावर तालुकास्तरावरुन कारवाई सुरु असल्याची माहिती आहे़ या कार्यवाहीनुसार त्या-त्या गावाचे तलाठी सर्वेक्षण करुन वनपट्टेधारक शेतकºयांच्या भेटी घेत आहेत़ यातून कृषी सौरपंप योजनेत अधिकाधिक शेतकºयांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रत्यक्षात मात्र कारवाई किती झाली याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही़चारही तालुक्यातील वनपट्टेधारक आदिवासी शेतकºयांच्या जमिनींना योजनेद्वारे पाणी मिळाल्यास त्यांच्या शेतीउत्पादनात वाढ होऊन धान्य आणि फळपिकांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे़ यामुळे वनपट्टेधारक सातत्याने या योजनेसाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेला मुकणार ७०० वनपट्टेधारक शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:14 IST