लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत स्वत:चे सिंचन करून घेतले असा आरोप करीत नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील 10 टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले जाईल. उकईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहादा येथील सभेत बोलतांना केले.शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी, नंदुरबार मतदार संघाचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली त्यात ते बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उमेदवार राजेश पाडवी, डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आदिवासींचे आरक्षण काढणार अशा खोटय़ा अफवा पसरवत आहेत. परंतु जगाच्या पाठीवर कोणीही आदिवासीचे आरक्षण काढू शकत नाही. संविधानाने त्यांना तसे अधिकार दिले आहे. आदिवासी बांधवांना कधी नव्हे एवढय़ा योजना पाच वर्षात राज्य शासनाने दिल्या. वन पट्टे, वनजमिनीचे राहिलेले दावे एक वर्षात निकाली काढू असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जयपालसिंह रावल, अभिजीत पाटील, आरपीआयचे अरविंद कुवर, शिवसेनेचे अरुण चौधरी, तळोदाचे नगराध्यक्ष अजय परदेशी, शहाद्याच्या उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, राजेंद्र गावीत, अभिजित पाटील, अतुल जायस्वाल, डॉ.शशिकांत वाणी, जितेंद्र जमदाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, के.डी.पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील ,रवींद्र राऊळ, बाजार समितीचे संचालक राजाराम पाटील, महेंद्र पाटील, रामभाई पाटील, अशोक टीला पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
Vidhan Sabha 2019 : नर्मदेचे दहा तर उकईचे पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार-मुख्यमंत्री फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:06 IST