लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील तळवे येथील युवतीसोबत ठरलेला विवाह मोडून तिच्या चारित्र्यावर संशय घेत छळ करणाऱ्या युवकासह त्याच्या कुटूंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बोराळे येथील कृष्णा जगदीश पाटील याचा विवाह तळवे येथील युवतीसोबत ठरवण्यात आला होता़ विवाह निश्चित झाल्यानंतर कृष्णा याने युवतीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक छळ सुरु केला होता़ दोघांचा विवाह २ मे रोजी निश्चित करण्यात आला होता़ यामुळे तळवे येथे विवाहाची सर्व तयारी पूर्ण झाली होती़ दरम्यान युवतीसोबत फोनवर बोलून तिचा छळ करणाºया कृष्णा याने २६ एप्रिल रोजी विवाह करण्यास नकार दिला होता़ यावेळी युवतीच्या वडीलांनी साखरपुड्यात दिलेली सोन्याची अंगठी, घड्याळ आदी ४९ हजार ८५० परत मागूनही कृष्णा व त्याच्या कुटूंबियांनी परत केलेले नाहीत़ याबाबत सोमवारी युवतीच्या वडीलांनी तळोदा पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे़यानुसार संशयित कृष्णा जगदीश पाटील, जगदीश गोविंद पटेल, दिपक जगदीश पटेल, विद्याबाई जगदीश पटेल सर्व रा़बोराळे ता़ नंदुरबार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करत आहेत़
ठरलेले लग्न मोडून तळवे येथील युवतीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:08 IST