या बैठकीत नंदुरबार जिल्हास्तरीय भटके-विमुक्त समूहातील धनगर, गवळी, बंजारा, वंजारी, भोई, गोसावी, चित्रकथी, कंजरभाट, वडार, वैदू, बेलदार, लोहार, गोंधळी, गोपाळ, तिरमले, ठेलारी, वाघरी, कैकाडी, कोल्हाटी, ओतारी, छप्परबंद, शिकलकर आदी ५३ जाती- उपजातीच्या सर्वांगीण विकासासाठी भटके-विमुक्त हक्क परिषद लढा देत आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी भटके-विमुक्त हक्क परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम काळे, प्रदेश संघटक सुपडू खेडकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रामकृष्ण मोरे म्हणाले की, मागासवर्गीय संदर्भात लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाने समकालीन अनुभवजन्य मागास स्वरूप माहिती विनाविलंब सादर करावी. तसेच पुरुषोत्तम काळे यांनी सांगितले की, बिंदुनामावलीनुसार पदोन्नती प्रक्रिया राबवावी. या वेळी सुपडू खेडकर यांनी संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा मांडला. प्रास्तविक श्याम राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम लांबोळे तर आभार भटके-विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हा सहसचिव महादू हिरणवाळे यांनी मानले.
या जिल्हास्तरीय बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर साबळे, चंदर भोई, रवी गोसावी, वरुण भारती, महेंद्र साठे, धनश्री अजगे, रवींद्र मुजगे, सेनू भोई, अशोक वैदू, राजू जाधव, रवी बेलदार, देवा चव्हाण, हाजी जब्बार शाह, मच्छिंद्र राठोड, भिकन पेटकर आदी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय बैठकीत आक्रोश व्यक्त करून सभेनंतर घोषणा देण्यात आल्या.