लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नंदुरबार व नवापूर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. प्रत्यक्ष घरकुल लाभाथ्र्याची चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. घरकुल लाभाथ्र्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.आवास सप्ताहनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नंदुरबार तालुक्यातील नटावद येथे भेट देत सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पिंपळोद येथील घरकुल लाभाथ्र्यांची भेट घेऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. नवापुर तालुक्यातील भादवड, पळसून, खांडबारा, वाटवी या ठिकाणी भेट देऊन त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा तसेच आरोग्य उपकेंद्रांची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. प्रत्येक ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना भेटी देऊन कामांची आजची परिस्थिती जाणून घेत सर्व लाभाथ्र्यांनी वेळेत काम पूर्ण करणे बाबत आवाहन करून अधिकारी व कर्मचा:यांना लाभाथ्र्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रय} करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जनतेच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचा:यांनी वेळोवेळी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा:यांना दिल्या. घरकुल योजनेच्या कामांसाठी घरकुल लाभाथ्र्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सीईओंनी केला घरकुल योजनेचा पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:22 IST