लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील तोरणमाळ येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विनय गौडा यांनी भेट दिली़ यावेळी उपस्थित विद्यार्थी संख्येवर समाधान व्यक्त करत केंद्रप्रमुख व शिक्षकांना तातडीच्या सूचनाही त्यांनी केल्या़ शनिवारी सकाळी ठीक 10 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी तोरणमाळ गाठून थेट जिल्हा परिषद केंद्र शाळा गाठली़ याठिकाणी शाळेच्या पहिली ते सातवीच्या वर्गातील 260 पैकी 210 विद्याथ्र्याची हजेरी होती़ दरम्यान त्यांनी वर्गनिहाय पाहणी करुन विद्याथ्र्यासोबत संवाद साधला़ यात पोषण आहार मिळतो किंवा कसे याची विचारणा करत पोषण आहार शिजवल्या जाणा:या खोलीची पाहणी केली़ भेटीवेळी शाळेत विजेची सोय नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विज कंपनीचे थकीत असलेले 20 हजार 700 रुपयांचे वीज बिल तातडीने ग्रामपंचायतीच्या रकमेतून भरणा करण्याचे सांगत विजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्य़ा़ प्रसंगी शिक्षक दादाभाई पिंपळे यांनी याठिकाणी एक शिक्षक, दोन विषय शिक्षक व पदोन्नती मुख्याध्यापक असे चार पदे रिक्त असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांना दिली़भेटीदरम्यान त्यांनी मुख्याध्यापक चोंगल्या चौधरी, दादाभाई पिंपळे, संदीप म्हमाणे, बाह:या चौधरी यांच्याकडून माहिती घेतली़ विनय गौडा यांनी तोरणमाळ केंद्रशाळेचे प्रमुख सुरेश तावडे यांना शाळेतील विद्याथ्र्याना त्वरीत शालेय गणवेश देण्याच्या सूचना करत लाभाच्या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये असे सांगितल़े याठिकाणी आदिवासी बोली भाषेतून शिकविल्या जाणा:या कवितांचे व विद्याथ्र्यासाठी चालवल्या जाणा:या माझा खडू माझा फळा या उपक्रमाचे कौतूक केल़े
भेटीदरम्यान चोंदण्यापाडा, खामसापाडा, विणदेवपाडा, पिंप्रीपाणी या पाडय़ांमधून शोधलल्या 162 विद्याथ्र्याची माहिती शिक्षक पिंपळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली़ त्यावर लवकरच मार्ग काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिल़े शाळेतील शिक्षक संदीप म्हमाणे व दादाभाई पिंपळे या दोघांचा शाळाबाह्य विद्यार्थी शोधाबाबत गौरव करण्यात आला़