गोविंद... गोविंद...च्या नामघोषात भाविकांनी देवास विडा, अवसर आणि गुंफलेले नारळ-सुपारी अर्पण करीत पविते केले. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या पर्वकाळात शेकडो भाविक सहभागी होत देवाला सुताने गुंफलेले व आकर्षक सजविलेले नारळ अर्पण करतात, त्यास विडा अवसर म्हणतात. सारंगखेडासह जयनगर, टेंभा, काहाटूळ, वरूळ कानडी, फेस फाटा, बामखेडा, हिंगणी परिसरात विविध दत्त मंदिरांत भगवंताचा जयघोष करण्यात आला. श्रावण पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा विधी होतो. दरवर्षी नारळी पौर्णिमेला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात पविते पर्व घरोघरी धार्मिक उत्सवाने साजरे करण्यात येते. भगवान श्रीकृष्ण तथा पंचावतारांना सुताने गुंफलेल्या नारळाचे पविते अर्पण करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत वेगवेगळे उत्सव साजरे करतात. मंदिरांमध्ये उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. घरोघरी देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते. सारंगखेडासह परिसरातील विविध महानुभावपंथीय मठ, मंदिरे व आश्रमात हा उत्सव साजरा करण्यात आला.
महानुभाव पंथीयांकडून पविते उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST