सर सैय्यद ऊर्दू गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शहादा
येथील सर सैय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष प्रा. सैय्यद लियाकत अली, संस्थेचे सभासद आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. संस्था अध्यक्ष प्रा. सैय्यद लियाकत अली यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षकांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. प्राचार्या हासमानी बिलकीस यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शाळेचे सुपरवायझर सैय्यद इफ्तेखार अली व वरिष्ठ शिक्षक सैय्यद अतहर अली यांनी परिश्रम घेतले. संस्था अध्यक्ष आणि संस्थेचे सभासद यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
भाजप शिक्षक सेलतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
नंदुरबार शहरातील विविध शाळांमधून गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली. भाजप शिक्षक सेलतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम भाजप जिल्हा कार्यालय येथे पार पडला. खासदार डाॅ. हिना गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, धनराज विसपुते, नरेंद्र माळी, भाजपा शिक्षक सेल शहराध्यक्ष जितेंद्र पगारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थी शिक्षक सीमा श्रीराम मोडक (डी. आर. हायस्कूल नंदुरबार), चंद्रशेखर गुलाबराव पाटील (डी.आर.हायस्कूल, नंदुरबार), प्रशांत प्रकाश पाठक (डी. आर. हायस्कूल, नंदुरबार), हेमंत रमण बोरसे (काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार), स्वाती योगेश कुलकर्णी (काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार), रवींद्र धोंडू सोनवणे (कमला नेहरू कन्या विद्यालय, नंदुरबार), मंगेश देवीदास चौधरी (कमला नेहरू कन्या विद्यालय, नंदुरबार), अनिल रतन चौधरी (पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार), चेतना तुळशीराम चौधरी (पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार), मनीष लाजरस पाडवी (एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), वंदना सुरेश जांबिलसा (एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय), जसवंत भगवान पवार (राजे शिवाजी विद्यालय, नंदुरबार), सुनील एकनाथ निकुंभे (महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, नंदुरबार), संतोष सुकलाल पाडवी (अभिनव विद्यालय नंदुरबार), पंकज यशवंत अहिरे (अभिनव विद्यालय, नंदुरबार), शिवाजी लक्ष्मण माळी (हि.गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार), राजेंद्र निंबाजी मराठे (हि.गो. श्रॉफ हायस्कूल नंदुरबार), दीपाली अमृतराव भामरे (स्वामी विवेकानंद हायस्कूल, नंदुरबार), प्रवीण पांडुरंग सोनवणे (स्वामी विवेकानंद हायस्कूल, नंदुरबार), अविनाश सुरेश मोरे (भाग्य चिंतन माध्यमिक विद्यालय, नंदुरबार) यांना वितरित करण्यात आले.
कार्यक्रमात खासदार डॉ. हिना गावीत यांनी, शिक्षकांना कोरोना वॉरियर्स म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी जितेंद्र माळी, जगदीश वंजारी, महेश चौधरी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश गवळे यांनी केले. आभार जितेंद्र पगारे यांनी मानले.