नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयात विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांच्या हस्ते याहा मोगी माता व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले.
प्रमुख वक्ते टीका पाडवी यांनी विश्व आदिवासी गौरव दिनाचा इतिहास आणि महत्त्व सांगितले. व्यासपीठावर राजन गायकवाड, दीपक माळी, जकू गावीत, राजेश वळवी व कांतीलाल वसावे उपस्थित होते.
प्रकाशा
प्रकाशा, ता. शहादा येथे विश्व आदिवासी व क्रांती दिनानिमित्त क्रांतिवीर बिरसा मुंडा, वीर एकलव्य, खाज्या नाईक, तंट्या भिल आदींचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुदाम ठाकरे, पंचायत समिती सदस्य जंग्या भिल, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, रफिक खाटीक, मच्छीमार जिल्हा सेल अध्यक्ष पंडित भोई, माजी ग्रामपंचायत सदस्य छोटू सामुद्रे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विजय जैन, अंबालाल चौधरी, नंदुरबार जिल्हा दिव्यांग सेल सदस्य विलास तांबोळी, गजानन भोई, अंबालाल कोळी, बापू बेडसे, रूपेश अजय भिल,
ग्रामस्थ, भाजपा युवा मोर्चा व भाजपा युवा वॉरियर्सचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नरेंद्र गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार पंकज कोळी यांनी मानले.
ग्रामपंचायत, प्रकाशा
प्रकाशा येथील ग्रामसचिवालयात आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी बी.जी. पाटील, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
के.डी. गावीत विद्यालय, कोरीट
कोरीट, ता.नंदुरबार येथील कृष्णराव दामजी गावीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विश्व आदिवासी दिवस व क्रांती दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच अनिता भिल, वासुदेव वळवी, शिवदास वळवी, सुदाम कोळी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश पाटील तर पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील होते. याप्रसंगी प्राचार्य मुकेश पाटील यांनी विश्व आदिवासी दिनाचा इतिहास व त्यातील झालेली उत्क्रांती, पेहराव, संस्कृती, बोलीभाषा याविषयी मार्गदर्शन केले. शशिकांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एस.एन. पाटील, व्ही.एस पाटील, एम.बी. पाटील, एस. पी. ओगले, आर.पी. सोनवणे, सविता पाटील, ज्योत्स्ना पाटील, सुनंदा पाटील, ज्युनियर कॉलेजचे प्रा. भरत चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील खाडे तर, आभार उपशिक्षक एस.व्ही. विसपुते यांनी मानले. कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.