नंदुरबार येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ शिक्षक वाय.एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मुख्याध्यापक एन.जी. भावसार यांनी शिक्षिका संगीता ब्राह्मणे यांचा सत्कार केला. तसेच सोनल महाले यांच्या सत्कार निंबा माळी यांनी केला. याप्रसंगी विजय माळी, प्रवीण सोनवणे, गणेश मराठे, प्रसाद माळी, जगन्नाथ माळी, धर्मेंद्र माळी आदी उपस्थित होते.
एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार येथील एस.ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि बाल न्याय मंडळाच्या सदस्या ॲड.सीमा खत्री उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका डॉ.सुनीता अहिरे होत्या. ॲड.खत्री यांनी महिलांच्या हक्कासंदर्भात असलेल्या कायद्याची माहिती दिली. डॉ.अहिरे यानी महिला दिनाची सुरुवात आणि इतिहास सांगितला. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षिका व कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यवेक्षक सॅबस्टिन जयकर, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख संजय जाधव आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियंका वळवी तर आभार संदीप शुक्ला यांनी मानले.
देवमोगरा विद्यालय, वसलाई
नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील देवमोगरा माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हेमंत खैरनार होते. प्रारंभी खैरनार यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन सुनील वळवी तर आभार कारभारी पाटील यांनी मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक प्रमोद सोनार, हेमंत पाडवी, दिलीप वळवी, मनेश वसावे, सुदाम गोराणे, शैलेंद्र वळवी उपस्थित होते.