सीसीटीव्हीचे जाळे ठरतेय लॉकडाऊनमध्ये उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 11:41 AM2020-04-05T11:41:20+5:302020-04-05T11:41:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी काळात शहरात लावण्यात आलेले ३० पेक्षा अधीक सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर मदत ...

CCTV network is becoming useful in lockdown | सीसीटीव्हीचे जाळे ठरतेय लॉकडाऊनमध्ये उपयोगी

सीसीटीव्हीचे जाळे ठरतेय लॉकडाऊनमध्ये उपयोगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी काळात शहरात लावण्यात आलेले ३० पेक्षा अधीक सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर मदत करीत आहेत. या कॅमेऱ्यांच्या आधारेच जेथे जास्त गर्दी होत असेल तेथे पोलीस पथक पाठवून नियंत्रण आणले जात आहे. दरम्यान, ८८ लाख रुपये खर्च करून नवीन ९० कॅमेरे बसविण्याचे बारगळे आहे. हे कॅमेरे देखील बसविले गेले असते तर आज संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात ते मोठ्या प्रमाणावर सहाय्यकारी ठरले असते.
कोरोनामुळे गेल्या २३ मार्चपासून राज्य शासनाने आणि त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यातच संचारबंदी देखील जाहीर करण्यात आली आहे. या काळात पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. आधीच आरोग्याची काळजी आणि त्यात बंदोबस्ताचा ताण यामुळे पोलीस कर्मचारी दुहेरी कसरत करीत आहे. त्यांच्या जोडीला होमगार्डही तैणात असले तरी मर्यादा येत आहे. परंतु या सर्वांमध्ये शहरात लावण्यात आलेले ३० सीसीटीव्ही कॅमेरे सध्या पोलीस प्रशासनाला मोठा आधार ठरले आहेत.
संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना सकाळी ८ ते १२ वाजेची वेळ दिली गेली आहे. या काळात बाजारात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची कसरत होते. परंतु सर्वच मुख्य बाजारपेठ आणि चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे पोलिसांना लागलीच गर्दीवरील नियंत्रणाचे नियोजन करण्यात मदत होत आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे नियंत्रणकक्ष पुर्वी टिळक रोडवरील फडके चौकीत होते. परंतु मध्यवर्ती आणि संवेदनशील भाग असल्यामुळे हे नियंत्रणकक्ष पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. त्यामुळे या ठिकाणाहून या कॅमेºयांचे नियंत्रण केले जाते तसेच त्यावर देखरेख ठेवली जाते.
विनाकारण फिरणाºयांवरही वचक
संचारबंदी काळात विनाकारण फिरणारे टोळके विविध चौकात दिसून येतात. सीसीटीव्ही मध्ये ते दिसताच लागलीच नियंत्रण कक्षातून पेट्रोलिंगच्या वाहनाला कळविले जाते. परिणामी अशा ठिकाणी लागलीच वाहन किंवा पथक पोहचून अशा रिकामटेकड्यांवर नियंत्रण आणले जाते. याशिवाय ज्या भागात विनाकारण गर्दी करणारे, खरेदीसाठी गर्दी करणारे किंवा पोलिसांशी हुज्जत घालणारे असतात तेथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांच्यावर पाळत ठेवून पोलिसांना कारवाई करणे सोपे जाते.
बाहेरच्या लोकांवर नजर
या माध्यमातून शहराबाहेरून आलेले, अनोळखी व्यक्ती यांना ट्रेस करणे देखील या निमित्ताने सोपे जात आहे. काही शहरांमध्ये ड्रोनचा आसरा घेतला जात आहे. परंतु नंदुरबारात आहे त्याच सीसीटीव्ही कॅमेरा नेटवर्कचा पोलीस प्रशासन खुबीने उपयोग करून घेत असल्याचे दिसून येत आहे.

प्रस्ताव बारगळला... चार वर्षांपूर्वी डीपीडीसीतून ८८ लाख रुपये नवीन कॅमेºयांसाठी मंजुर करण्यात आले होते. मंजुर निधीतून तब्बल ९० कॅमेरे बसविण्यात येणार होते. यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये उच्च दर्जाचे कॅमेर अर्थात एएनपीआर दर्जाचे कॅमेरे राहणार होते. या कॅमेºयांचे वैशिष्टे म्हणजे कितीही वेगाने अर्थात १४० किलोमिटर प्रती तास या वेगाने जरी वाहन गेले व कॅमेºयाची नजर जर त्या वाहनाच्या नंबर प्लेटवर गेली तर ती नंबर प्लेट कॅच करण्याची क्षमता या कॅमेºयांमध्ये होती. त्यामुळे बाहेरून संशयीत वाहने, अवैध वाहतुकीची वाहने, संशयीत व्यक्ती यांच्यावर नजर ठेवली जाणार होती. परंतु तो प्रस्ताव बारगळला आहे. ते कॅमेरे बसविले गेले असते तर लॉकडाऊनच्या काळात त्यांची मोठी मदत कायदा व सुव्यवस्थेसाठी राहिली असती.

Web Title: CCTV network is becoming useful in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.