शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दहावीचा सीबीएसईचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीबीएसई अभ्यासक्रमाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहिर झाला असून, शहादा येथील महावीर स्कूलचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सीबीएसई अभ्यासक्रमाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहिर झाला असून, शहादा येथील महावीर स्कूलचा सिद्धार्थ जोशी हा विद्यार्थी ९७.९३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आला आहे. तर जिल्ह्यातील चारही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.सीबीएसई अभ्यासक्रमातील पाच शाळातील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. बुधवारी दुपारी निकाल जाहीर झाला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून बाजी मारली. महावीर इंग्लिश मीडियम स्कुलच्या लोकेश संजय पाटील यास गणित विषयात १०० पैकी १०० गुण तसेच ३ विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान (कळ) विषयात १०० पैकी १०० गुण. विविध शाळांना निकाल असा.महावीर स्कूलचा १०० टक्के निकाल, शहादासीबीएसई बोर्डाद्वारा शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत शहादा शहरातील महावीर इंग्लिश मीडियम स्कुलचा १००% निकाल लागला. यंदाही निकालाची  परंपरा कायम राखत परिसरात नावलौकिक मिळविला आहे. परीक्षेत  शाळेतील एकूण १२९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून, त्यातील १८ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले तर ३४ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच ३१ विद्यार्थी ७०% पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले. यात सिद्धार्थ जोशी (९७.३३%), स्नेहा जैन (९७.१७), आदर्श चौधरी (९६), दुर्वेश पाटील (९४.३३), श्रीरंग सावळे (९४.३३), हर्षवर्धन मोहिते (९३.८३), लोकेश पाटील (९३.८३), साक्षी जैन (९३.६७), उदित जैन (९३.६७), रोहन पाटील (९३.५०), नम्रता जैन (९२.१७), मयूर पाटील (९२), नुपूर चौधरी (९१.६७), ओम निकम (९१.१७), प्राची चौधरी (९०.८३), हर्षित जैन (९०.८३), रिया जैन (९०.६७), समी हसमानी (९०.६७), या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अध्यक्ष रमेशचंद चोरडिया, उपाध्यक्ष विनयजी गांधी, शाळेचे सचिव पारसजी देसर्डा व शाळेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य अनिलजी छाजेड, हेमल गांधी, चंदनमल जैन, समीर जैन तसेच शाळेचे मुख्याधापक ए.एम.पाटील, उपमुख्याधापक किशोर चौधरी तसेच शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.पी.जी.पब्लिक स्कूल, नंदुरबारसीबीएसईचा दहावीचा निकाल बुधवारी जाहिर होताच नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील पी.जी. पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी ९० टक्केच्यावर गुण प्राप्त केले आहे. यात कृष्णा सूर्यकांत पंजराले (९५.४ टक्के), कृतिका अनिल पाटील (९३.४), मनुदीपक दीपकसिंग गिरासे (९१.६) तर प्रतिक्षा चंद्रकांत धनगर (९०) आली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी, सिद्धार्थ रघुवंशी, अ‍ॅड.रूद्रप्रताप रघुवंशी, प्राचार्य आनंद रघुवंशी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.के.आर. पब्लिक स्कूलचा १०० टक्के निकालनंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूलचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला. यात मयंक पाल, अनस कुरेशी व पंकज वाक्से या तीन विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत १० सीजीपीए असे ग्रेड मिळविले. या वेळी ७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात उच्च श्रेणीत ४४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत २१ विद्यार्थी तर द्वितीय १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे चेअरमन किशोर वाणी, व्हा.चेअरमन सिद्धार्थ वाणी, प्राचार्या छाया शर्मा, उपप्राचार्य नदीम शेख व शिक्षक, कर्र्मचाºयांनी कौतुक केले.डी.जी.अग्रवाल स्कूल, चिंचपाडाचिंचपाडा, ता.नवापूर येथील धर्मीबाई गिगराज अग्रवाल मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम पियुष कुमार घोष (९० टक्के), द्वितीय आदित्य मिथेलेश रोय (८९.४ टक्के) व तृतीय यशराज सतीश घरटे (८३.४) आला. या वेळी ५३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष निरंजन अग्रवाल, उपाध्यक्ष, प्राचार्य यांनी कौतुक केले.