नंदुरबार : नंदुरबार येथील सी़बी़ गार्डनमध्ये आपसातील वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारात घडली़ या वेळी दोन्ही गटातील युवकांनी परिसरातील तीन चारचाकी व दोन दुचाकी वाहनांचे तोडफोड केली़ पोलीस वेळीच दाखल झाल्याने वाद अधिक चिघळला नाही़नंदुरबार येथील सी़बी़ गार्डन मध्ये शहादा येथील तरुणांचा एक गट व नंदुरबार येथील तरुणांचा गट यांच्यात आपसी वादातून बाचाबाची झाली़ त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल़े दोन्ही गटातील युवकांनी लाठय़ा-कांठय़ांचा वापर करत एकमेकांवर हल्ला चढवला़ यात दोन्ही गटातील युवक जखमी झाल़े दोन्ही गटातील युवकांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या स्थानिक कर्मचा:यांनाही यात मारहाण करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े या वेळी दोन्ही गटातील युवकांचा जमाव जमा झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होत़े उपनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला़ दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांवर कारवाई करण्याची मागणी करत उपनगर पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती़ गार्डनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांची तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दोन्ही गटांकडून होत आह़े पोलिसांकडून तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आह़े रात्री उशिरार्पयत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत होती़
किरकोळ कारणावरून सी़बी़ गार्डन उद्यानात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:50 IST