शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

मदतीसाठी पूरग्रस्तांची प्रशासनाकडे याचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पूरस्थिती ओसरल्यानंतर पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनवर्सनाकडे लक्ष दिले जात  नसल्याने त्यांची आबाळ सुरु आह़े गावोगावी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पूरस्थिती ओसरल्यानंतर पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनवर्सनाकडे लक्ष दिले जात  नसल्याने त्यांची आबाळ सुरु आह़े गावोगावी पुरामुळे घरात साचलेला चिखल तसेच शेतातील पाणी काढण्यासाठी कोणतीही साधने नसल्याने समस्या वाढत आहेत़ प्रशासनाकडून पंचनामे वेगात सुरु असले तरी अनेकांनी मदत देण्याची मागणी केली आह़े      जिल्ह्यात बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात कोसळलेल्या संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती़ शनिवारी सायंकाळनंतर पूर ओसरल्यावर प्रशासनाकडून पंचनामे करण्यास प्राधान्य देण्यात आले होत़े पूरानंतर अनेक ठिकाणी हवी ती मदत न पोहोचल्याने नुकसानीचा आकडा वाढत असल्याचे दिसून आले आह़े खासकरुन शेतशिवारात साचलेले पाणी काढण्यासाठी योग्य ती साधने न मिळाल्याने फोडलेल्या बांधातून शेताची माती गाळाच्या रुपाने वाहून गेल्याने शेतक:यांचे नुकसान झाले आह़े अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव आणि तळोदा या चार तालुक्यात रविवारी दिवसभर पंचनामे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े शनिवारी सायंकाळर्पयत नंदुरबार तालुक्यातील पंचनामे पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबारतालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड परिसरात गत 15 दिवसांपासून सुरु असलेल्या घरांची पडझड झाली आह़े घरांच्या भिंती कोसळल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत़ परिसरातील रजाळे, सैताणे, खर्दे खुर्द या भागात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आह़े बलवंड शिवारातील पाणबारा तलाव 12 वर्षानंतर भरल्याने समाधान व्यक्त होत आह़े दरम्यान ढंढाणे येथील धरणाला तडे गेल्याची अफवा पसल्याने धरणात जाणा:या पाण्याचे नाल्याचा मार्ग वळवत शेतक:यांनी वावद मार्गाकडे वळवल्याने तेथील नाल्यांना पाणी आले होत़े यातून शुक्रवारी बलवंड, वैंदाणे, शनिमांडळकडे जाणारी वाहतूक तीन तासांपेक्षा अधिक काळ थांबून होती़ या भागातून वाहणा:या अमरावती नदीला अनेक वर्षानी पूर आल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त करण्यात येत होत़े. तालुक्याच्या पूर्व भागासोबतच तापी काठ परिसरातील गावांमध्ये सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आह़े कोळदे येथील गावतलाव पूर्ण भरल्यानंतर सांडव्यावरुन वाहणारे पाणी शेतशिवारात शिरले आह़े हे पाणी काढण्यासाठी शेतक:यांची मोठी कसरत सुरु आह़े हाटमोहिदे, जुनमोहिदे, खोंडामळी, कोपर्ली, कलमाडीसह विविध गावांमध्ये शेतशिवारात पाणी गेल्याने नुकसान झाल्याची आह़े नंदुरबार तालुक्यात बंधारा फुटला तालुक्यातील पिंपळोद येथे गाव तलावाला भगदाड पडल्याने तो फुटला़ यामुळे तलावातून निघालेले पाणी थेट गाव आणि धानोरा रस्त्यावर आले होत़े शुक्रवारी रात्री हा तलाव फुटल्याची माहिती देण्यात आली आह़े तलावातील पाण्यामुळे अनेकांची शेती पाण्यात गेली असून गावातील घरांमध्येही पाणी शिरले होत़े या प्रकाराची प्रशासनाने दखल घेत पंचनामे करण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़ेअक्कलकुव्यात वाहनांच्या रांगा  नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील मोदलपाडा ते वाण्याविहीर दरम्यानच्या पुलाला भगदाड पडल्याने वाहतूकीवर परिणाम होऊन अक्कलकुव्यात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आह़े दोन्ही बाजूने संथ गतीने वाहतूक सुरु असल्याने मार्गावर वाहतूक कोंडी होत आह़े पावसामुळे नेत्रंग-शेवळी राष्ट्रीय महामार्गाची वाताहत झाली आह़े अनेक लहान-मोठय़ा पुलांचे भराव खचले आहेत. अक्कलकुवा-सोरापाडाला जोडणा:या वरखेडी नदीच्या पुलालाही सोरापाडाच्या बाजूने भगदाड  पडले आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्यात येत असून शनिवारी सकाळपासून पुलाच्या दोन्ही बाजूला ट्रक-ट्रालाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नंदुरबार तालुक्यात 887 घरांची पडझड 

नंदुरबार तालुका प्रशासनाने पंचनाम्यांना वेग दिला होता़ यांतर्गत तालुक्यातील 887 घरांची अंशत: पडझड झाल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यातील सहा ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले आह़े यात वडझाकण येथे चार तर खामगाव येथे दोन घरे पूर्णत: कोसळली आहेत़ तालुक्यातील 152 गावांमध्ये पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली होती़ या सर्व गावांमध्ये रविवारी सकाळपासून पंचनामे सुरु करण्यात आले होत़े यातील 45 गावांमध्ये दुपार्पयत पंचनामे पूर्ण झाले होत़े उर्वरित गावांमध्ये रात्री उशिरार्पयत काम सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आह़ेदरम्यान पुराच्या पाण्यामुळे 30 मेंढय़ा दगावल्याची माहिती असून बलवंड येथे दोन बैल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला़ संततधार पावसामुळे आलेल्या पुरात तालुक्यातील 502़ 58 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे समोर आले आह़े पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील 3 पूल बाधित झाले आहेत़ 

धडगाव तालुक्यात 68 घरांचे नुकसान 

धडगाव तालुक्यात गत 16 दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आह़े ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात तालुक्यातून वाहणा:या उदय नदीसह नाल्यांना पाणी आले होत़े तसेच 7 ते 9 ऑगस्ट यादरम्यान झालेल्या पावसामुळे पुन्हा नदी नाले दुथडी भरुन वाहत होत़े यातून तालुक्यातील 68 घरांचे नुकसान झाले आह़े 100 गावांमध्ये 68 घरांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यातील 5 गावात 14 घरांची संपूर्णपणे पडझड झाली असून यात 10 गुरे मयत झाली आह़े तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता़ तालुक्यातील पुरामुळे 209़ 11 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आह़े रविवारी दिवसभरात प्रशासनातील अधिकारी दुर्गम भागात पंचनामे करुन पाहणी करत असल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यातील अतीवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात तालुक्यातील विविध रस्त्यांवरील 13 पूल पूर्णपणे बाधित होऊन रस्त्याचे भराव वाहून गेले आहेत़ 1 समाजमंदिर तर 15 शाळा आणि अंगणवाडय़ा यांचेही नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े 

180 घरांची पडझड

अक्कलकुवा तालुक्यातील 180 घरांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े यात सोरापाडा, अक्कलकुवा, मक्राणीफळी, कंकाळी, गंगापूर, कंकाळा या ठिकाणी घरांची पडझड झाली आह़े पुराच्या पाण्यात सिंगपूर येथील लिलाबाई विजयसिंग पाडवी (55) यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता़ त्यांच्याही कुटूंबियांची भेट घेत प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला़ तालुक्यात आतार्पयत 7 गुरे मयत झाल्याचे स्पष्ट झाले असून दुर्गम भागातील पंचनाम्यांचे अहवाल अद्याप हाती आलेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े सोमवारी दुपार्पयत अंतिम अहवाल प्रशासनाकडे येणार आह़े 

तळोदा तालुक्यात 200 घरांची पडझड 

गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे साधारण 200 घरांची पडझड झाली आह़े त्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून भरपाई देण्याची तयारी सुरु करण्यात आली आह़े. तळोदा शहरासोबतच तालुक्यात संततधार सुरु होती़ त्यातच गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात अतीवृष्टी झाल्याने घरांची पडझड झाली़ प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीनुसार या घरांचे पंचनामे करण्यासाठी तालुका महसूल प्रशासनाने कर्मचा:यांना युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार कर्मचा:यांनी पंचनामे करुन प्रशासनाकडे अहवाल सादर केला आह़े प्रशासनाच्या आकडेवारीनुसार तळोदा शहरासह ग्रामीण भागातील सुमारे 200 घरांची पडझड झाली आह़े काही घरांचे अंशत: तर काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आह़े. त:हावद, मोड पुनर्वसन, रोझवा पुनर्वसन, इच्छागव्हाण या गावांमध्ये पाणी शिरुन अनेकांचचे संसार उध्वस्त झाले आहेत़ मोड पुनर्वसन येथे 38 तर ईच्छागव्हाण येथे 90 घरांमध्ये पाणी शिरले होत़े याठिकाणी तहसीलदार पंकज लोखंडे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी जेसीबी लावून पाणी काढले होत़े आमदार उदेसिंग पाडवी यांनीही तालुक्यात नुकसानीची पाहणी केली होती़