लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरु करण्यासाठी बांधकाम विभागाच्या सांगण्यानुसार देवगोई घाटाची परिवहन महामंडळाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीत बस सेवेसाठी रस्ता अनुकुल असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 13 नोव्हेंबरपासून मोलगी व धडगाव भागातील बससेवा सुरू करण्यात येणार आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळल्या व रस्ताही वाहून गेला. शिवाय दुर्गम भागातील काही रस्त्यांचीही दुरावस्था झाली. त्यामुळे अक्कलकुवापासून मोलगी व धडगावर्पयतची बससेवा परिवहन महामंडळामार्फत बंद करण्यात आली होती. घाटातील रस्त्याची दुरुस्ती झाली असतानाही मोठी वाहतुक बससेवेसाठी रस्ता प्रतिकुलच ठरत होता. परिणामी बससेवाही बंदच ठेण्यात आली होती. त्यात अक्कलकुवा आगारामार्फत 40 तर याच मार्गावरुन धडगावर्पयत जाणारी नंदुरबार आगाराच्या दोन बसफे:या अशा एकुण 42 बसफे:या बंद होत्या. त्यात अक्कलकुवा ते मोलगी, कोठली, भगदरी, धडगाव, जमानामार्गे धडगाव, डाब, जमाना, बिजरीगव्हाण व नंदुरबार ते धडगाव आदी बसेसचा समावेश होता. अक्कलकुवा आगाराला 40 बंद बसफे:यांमधून एक लाख 60 हजाराचे दैनंदिन तर चार महिन्याच्या कालावधीत दोन कोटी पेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागल्याचे अक्कलकुवा आगारामार्फत सांगण्यात आले. बांधकाम विभागामार्फत हिरवी ङोंडी दाखविल्याशिवाय बससेवा सुरू करता येत नव्हती. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने महामंडळाला बांधकाम विभागामार्फत बससेवा सुरु करण्यासाठी रस्त्याची पाहणी करण्याचे पत्र देण्यात आले. त्यानुसार महामंडळाच्या पदाधिका:यांनी अक्कलकुवा ते मोलगी व धडगावर्पयतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यात रस्ता बससेवेसाठी अनुकुल असल्याचे आढळून आले. त्यामुळे महामंडळाच्या बसेस 13 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगारामार्फत सांगण्यात आले. पाहणी करताना आगारप्रमुख आर.आर.फुलपगारे, वाहतुक नियंत्रक के.एस.पराडके, वाहतुक निरीक्षक आर.बी.वळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांना पुन्हा सुखरुप प्रवासाचे साधन उपलब्ध होणार असून जमाना मार्गावरही बस सुरू होण्याच्या शक्यता आहे.बांधकाम विभागामार्फत दवगोई घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले, परंतु त्यात मोठी कामेच झाली आहे. दुर्वरित मालीआंबा ते देवगोईर्पयतची किरकोळ कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे म्हणत परिवहन महामंडळाच्या पदाधिका:यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा किरकोळ कामांमुळेही वाहतुक अडचणीत येऊ शकते, त्यासाठी स्थानिक राजकीय पदाधिका:यांना पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दिवाळीनिमित्त धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे एकमेव यात्रा भरली. एकमेव यात्रेमुळे अस्तंबाकडे जाणा:या भाविकांची संख्या मोठी होती. ही यात्रा परिसरातील प्रवास सेवा ही बाब अक्कलकुवा आगारासाठी हक्काचीच ठरत असते. या यात्रेसाठी अक्कलकुवा आगारामार्फत प्रवाशांची गर्दी पाहून ज्यादा बसेसही सोडल्या जातात, त्यातून आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होते, शिवाय भाविकांची देखील सोय होत असते. परंतु यंदा रस्ताच खराब झाल्यामुळे अस्तंबा भागातील बसफे:या बंद करण्यात आल्या. त्यामुळे त्या भागातील दिवाळी हंगामातील मोठय़ा उत्पन्नावर आगाराला पाणी सोडावे लागले.
देवगोई घाटात आजपासून धावणार बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:01 IST