लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बैल खुरीच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी खळे मजबूत राहत असल्याची भावना दुर्गम भागातील शेतक:यांची आहे. त्यामुळे तेथे आजही पारंपरिक पद्धतीनेच खळे तयार करण्यात येत आहे. सातत्याने होणा:या पावसामुळे दुर्गम भागातील काही शेतक:यांच्या पिके कापणीच्या कामात व्यत्यय आला. त्यामुळे आता खळे निर्मितीला वेग आला आहे. धडगाव व मोलगी भागात आधुनिकतेतही मळणीच्या कामांना पारंपरिक पद्धतीला प्राधान्य दिले जात आहे. कुठलीही पिके बैलांच्या माध्यमातून मळणी केली जाते. सहज तयार केलेल्या खळ्यांचा बैलांच्या खुरीसमोर टिकाव लागत नाही. बैलांच्या एखाद-दुस:या फेरीतच खळे उखडले जातात. त्यात मळणी होणा:या शेतमालाचे नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी दुर्गम भागातील शेतक:यांकडून बैलखुरीच्या माध्यमातूनच खळे तयार केली जात आहे. जमीन ओली करीत रात्रभर ओलावा ठेवल्यानंतर सकाळी ओळीत बैल जुंपून ओल्या जमीनीवरच फिरवण्याची प्रथा दुर्गम भागात आहे. बैल फिरवतांना शेणयुक्त पाण्याचा शिडकावा दिला जातो. ओल्या जमीनीत बैलांच्या कुरीमुळे शेणाचे कण खोलवर रुजतात, त्यामुळे दर्जेदार खळे तयार होत असते. त्यानुसारच यंदाही खळे तयार करण्यात येत आहे. अशा पद्धतीने तयार केलेली खळे पुन्हा बैलांच्या खुरीने उखडत तर नाहीच त्या-त्या खळ्यांमध्ये कितीही पाऊस पडला तरी त्या खळ्यांवरच फारसा परिणाम होत नसल्याचे कुंडल ता.धडगाव येथील धनसिंग पाडवी या शेतक:याने सांगितले.
बैलांच्या माध्यमातून केली जाणारी मळणी झाल्यानंतर शेतमाल उफळणीसाठी चांगल्या हवेची आवश्यकता भासते. शेतक:यांना अपेक्षीत असलेली खेळती हवा ही टेकडीवरच राहत असते. त्यामुळे प्रत्येक शेतक:यांकडून पिकांच्या मळणीसाठी टेकडय़ांवरच खळे तयार करण्यात येत आहे.