लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. या रस्त्याच्या नर्मदा नदीवर पुलाचे कामही सुरू करण्यात आले परंतु हे काम अद्याप अपूर्णच असल्यामुळे साव:यादिगरसह काही गावांच्या विकासासाठी हे अर्धवट काम मृगजळ ठरत आहे. धडगाव तालुक्यातील साव:यादिगर हे गाव सरदार सरोवरच्या फुगवटय़ामुळे बेट बनले आहे, या गावाच्या पुनर्वसानसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु 2005 मध्ये भिंगारे समिती स्थापन कण्यात आली. या समितीने साव:यादिगर गावासाठी बिलगावपासून रस्ता उपलब्ध करून दिल्यास हे गाव टापू क्षेत्रात येणार नसल्याचा अहवाल सादर केला होता. दळण-वळणाची सुविधा झाल्यास हे गाव पुनर्वसन करण्याची आवश्यकता भासणार नाही असल्याचेही समितीने अहवालात नमुद केले होते. त्याशिवाय समितिने रस्ता पूर्ण होईर्पयत नर्मदा विकास विभागाने साव:यादिगरच्या नागरिकांना बोट व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, असा सल्लाही दिला होता. समितीच्या अहवालानुसार तेथे पुलाचे कामही सुरू करण्यात आले, परंतु हे काम अजुनही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. रस्ता व पुलासाठी शासनामार्फत करोडोचा निधी मंजूर करीत कामही सुरू करण्यात आले, परंतु दोन वर्षापासून पुलाचे थांबले आहे. मागील वर्षी भूषा ता.धडगाव येथे मासेमारी समितीला भेट देण्यासाठी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे सदस्य डॉ. अफरोज अहमद यांनी रस्त्यात लागणा:या या पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. दरम्यान पुलाच्या कामात अनियमितता दिसून आल्याने अहमद यांनी संबंधित अधिका:यांना धारेवर धरले. त्यावेळी मार्च अखेर्पयत पुलाचे काम पूर्ण कारण्याचे आदेश दिले होते. तरीही कामात मनमानीच दिसून येत आहे. त्यामुळे अहमद यांच्या आदेशालाही संबंधितांकडून केराची टोपली दाखविल्याचे म्हटले जात आहे.
ाुलाचे काम रखडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात साव:यादिगरसह त्यापुढील गावांमधील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली. पावसाळ्यातील सहाही महिने तेथील नागरिकांना ताटकळत राहावे लागले, नदीला पुर आल्यास नागरिकांना थांबून राहावे लागत होते. अशा अडचणीनंतरही प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.