दोन तालुक्यांचा सेतू ठरतो धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:43 PM2020-02-25T13:43:03+5:302020-02-25T13:43:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या व अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यातंना जोडणारा ...

The bridge between the two talukas leads to danger | दोन तालुक्यांचा सेतू ठरतो धोक्याचा

दोन तालुक्यांचा सेतू ठरतो धोक्याचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या व अक्कलकुवा व धडगाव या दोन तालुक्यातंना जोडणारा पुलाची उदय नदीच्या पुरात नेहमीच नासधुस झाली. मागील अतिवृष्टीत मात्र हा पूल पूर्णत: पोखरला गेला आहे. शिवाय कठडे तुटल्यामुळे हा पूल वाहतुकीला धोक्याचा ठरत आहे. हा धोका टाळण्यासाठी तेथे नवीन पुलाची आवश्यकता भासत आहे.
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या मुख्य रस्त्यांमध्ये असली ते धडगाव व डाबमार्गे असली ते अक्कलकुवा या या रस्त्याचाही समावेश आहे. या मार्गावर १९९० च्या कालावधीत असली गावाजवळ उदय नदीवर पुल बांधण्यात आला. त्यामुळे अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके जोडले गेले. या पुलाच्या माध्यमातूनच या दोन्ही तालुक्यांमधील नागरिकांना वाहतुकीची सुविधा निर्माण झाली आहे. परंतु नदीला येणाऱ्या पूराच्या प्रवाहाच्या दृष्टीने या पुलाची रचनाच काही अंशी चुकीची ठरते. त्यामुळे वाहतुक सविधेला धोका निर्माण झाला आहे.
अनेक नदी-नाल्यांमधून तयार झालेली उदय नदी ही या दोन्ही तालुक्यांमधून वाहणारी व नर्मदा नदीची सर्वात मोठी नदी आहे. या नदीला दर पावसाळ्यात मोठा पूर येत असतो. त्या पुरपातळीच्या तुलनेत या पुलाची उंची अत्यंत कमी ठेवण्यात आली. त्यामुळे उदय नदीला आलेला प्रत्येक पूराचे पाणी या पुलावरुनच जाते. त्यात पुलाच्या कठड्याची पुर्णत: दुरवस्था झाली. त्यामुळे हा पूल काही वर्षांपासून वाहतुक सेवेला धोक्याचा ठरतो.
हा धोका कायम असतानाच मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे या पुलाच्या ओघवता भाग पूर्णपणे पोखरला गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतुकीला दुहेरी धोका निर्माण झाला आहे. हा धोका तथा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी पुराच्या तुलनेत नवीन उंच पूल बांधण्याची नितांत आवश्यकता आहे. हा मार्ग त्यामुळे संबंधित यंत्रणेमार्फत या दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.

पूल पूर्णपणे पोखरला गेल्यामुळे पुढील पावसाळ्यात हा पूल तुटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना व वाहतुकीची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या ंिंठकाणी नवीन पूल निर्माण होणे अत्यावश्यक आहे.
या ठिकाणी नवीन पूल तयार करण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला उंच भाग असल्यामुळे पूल निर्मितीसाठी अतिरिक्त भरावाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे हे ठिकाण नवीन पुलासाठी अनुकूल आहे.
नवीन पुलाची मागणी करतांना दोन्ही तालुक्यांमधील नागरिकांमार्फत पुराच्या तुलनेत व सुरक्षेसाठी समाधानकारक उंचीचा पूल असावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळीच्या कालावधीत मोठी यात्रा भरणाऱ्या अस्तंबा या गावाकडे जाण्यासाठी देखील हाच पूल सोयीस्कर ठरतो. तेथे जाणाºया भाविकांची संख्या अधिक राहत असून त्यांची सुरक्षा व सोयीसाठी येथे नवीन पुलाची आवश्यकता आहे.

Web Title: The bridge between the two talukas leads to danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.