शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

लघुसिंचन विभागातील लाचखोर अधिकारी अटकेत ११ हजारांची रक्कम : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा

By admin | Updated: May 14, 2014 08:59 IST

धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्‍याच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उप विभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

जळगाव : धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्‍याच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उप विभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्‍याचे काम सिंचन विभागाकडून तक्रारदार (तक्रारदाराच्या विनंतीवरुन विभागाने नाव गुप्त ठेवले) यांच्या सोसायटीला मंजूर झाले होते. सन २०१२/१३ मध्ये या बंधार्‍याची कामे पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी दोन्ही बंधार्‍याची सुमारे १८ लाखांची बिले तयार करून ती लघुसिंचन विभाग येथे जमा केली होती. ही बिले मंजूर होऊन त्यातील १२ लाखांची रक्कम त्यांना मिळाली आहे. मात्र या बिलातील २० टक्के रक्कम एक लाख ७५ हजार रुपये सिंचन विभागाकडे शिल्लक आहेत. ही रक्कम घेण्यासाठी तक्रारदार हे लघुसिंचन विभागच्या कार्यालयात गेले असता उपविभागीय अधिकारी सुरेश शिंपी यांनी त्यांच्याकडून संपूर्ण बिलावर अडीच लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी हे काम आपल्याला परवडले नसल्याचे सांगितल्याने त्यांनी तडजोड करीत दहा हजार रुपयांची लाच मागितली.तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येत उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, साहाय्यक फौजदार मोजोद्दीन शेख, ज्ञानदेव घुले, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब जाधव, राजन कदम, हेमंत शिरसाठ, संजय अहिरे, विजय दुसाने, अनिल चौधरी यांनी लघुसिंचन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. शिंपी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये ११ हजार रुपयांची लाच घेतांना दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास उपअधीक्षक डी.डी.गवारे करीत आहेत.