शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

संपर्क साखळी तोडा आणि कोरोना पळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा आणि नवापूर तालुक्यात संपर्क साखळी वेळीच खंडीत करण्यासाठी स्वॅब तपासणी वाढविण्यावर आणि आजाराची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा आणि नवापूर तालुक्यात संपर्क साखळी वेळीच खंडीत करण्यासाठी स्वॅब तपासणी वाढविण्यावर आणि आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तिंचे गृह विलगीकरण त्वरीत करण्यावर अधिक भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.कोविड-१९ बाबत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकरी महेश पाटील उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, स्वॅब तपासणीबाबत जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात. स्वॅब तपासणीसाठी विरोध असलेल्या भागात त्याच भागातील स्वयंसेवकांची आणि डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. ग्रामीण भागात स्वॅब घेण्यासाठी फिरते पथक नेमण्यात यावे. स्वॅब तपासणी वाढवून बाधित व्यक्तिंवर त्वरीत उपचार करण्यात यावेत, तसेच संपर्कातील व्यक्तिंची सूक्ष्मपणे माहिती घ्यावी. अक्कलकुवा तालुक्यात भविष्यातील गरज लक्षात घेवून वैद्यकीय सुविधांची त्वरीत निर्मिती करावी. गृह अलगीकरणात असलेल्या बाधित व्यक्तिंची दररोज माहिती घेण्यात यावी. ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन त्वरीत करावे. कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधील जैववैद्यकीय कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची दक्षता घ्यावी. अधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाºया सुविधांची माहिती घ्यावी. बाधित व्यक्तिंच्या नोंदी वेळोवळी अपडेट कराव्यात, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी ताप किंवा अन्य लक्षणे असलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यास १० दिवस गृह विलगीकरणात राहण्यास सांगावे व त्यानंतरही काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागास माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.स्वॅब तपासणी प्रलंबित असल्याबाबत तालुका स्तरावर दैनंदीन स्वरुपात आढावा घेण्यात यावा व प्रलंबित स्वॅबची माहिती संबंधितांना वेळीच देण्यात यावी, असे पाटील यांनी सांगितले.बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिकचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

४सीईओ गौडा म्हणाले, प्रति लाख चाचणीची संख्या वाढवावी. भाजीपाला विक्रेते आणि दुकानदारांची अँटीजन टेस्ट करून घ्यावी. गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नेमून आवश्यक पाठपुरावा करण्यात यावा. स्वॅब तपासणीची माहिती संबंधितांना त्वरीत देण्यात यावी. त्यांच्या मोबाईलवर एसएमएस येत असल्याने त्यांनी दिलेला क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.