लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील हुडको कॉलनीत घरात शिरुन चोरटय़ांनी दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ चोरटय़ाने दोराच्या सहाय्याने दुस:या मजल्यावर चढून ही चोरी केली होती़ हुडको कॉलनीतील प्लॉट क्रमांक 45 मध्ये राहणा:या प्रभाकर बबन पवार यांच्या दुस:या मजल्यावरील घरार्पयत पोहोचण्यासाठी चोरटय़ाने दोराचा वापर करत आत प्रवेश मिळवला होता़ मागील भागातील किचनच्या दरवाजातून घरात प्रवेश करत बेडरुममधील कपाट फोडून आतील 39 हजार 600 रुपयांचे दागिने आणि 15 हजार रुपये असा ऐवज चोरटय़ाने चोरुन नेला़ याप्रकरणी प्रभाकर पवार यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े
शहरातील हुडको कॉलनीत धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:21 IST