शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल कुटुंब धान्यापासून वंचित : तळोद्यात महिला संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:34 IST

ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात तहसीलदारांना घेराव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : पालिकेकडून दारिद्रय़ रेषेखालील दाखला देऊनही केवळ पुरवठा विभागाच्या उदासिन धोरणामुळे शासनाच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याने संतप्त महिलांनी येथे जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमातच तहसीलदारांना धारेवर धरले. दरम्यान, अशा गरीब - गरजू लाभाथ्र्याची यादी तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या महिला स्वस्थ झाल्यात. एकीकडे जागतिक ग्राहक दिन साजरा करीत असताना ग्राहकांचाच रोष पत्करावा लागत असल्याची नामुष्की महसूल प्रशासनावर ओढविली.तळोदा येथील प्रशासकीय इमारतीत जागतिक ग्राहक दिन आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी विनय गौडा, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ.वसंत काकडे,  पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई पवार, तहसीलदार योगेश चंद्रे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ.कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ते व विनय गौडा निघून गेले. त्यानंतर कार्यक्रम चालू असतांनाच महिलांनी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या स्वस्त धान्यापसून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत तहसीलदारांना घेराव घातला होता. वास्तविक नगरपालिकेने आम्हास दारिद्रय़रेषेचा दाखला दिलेला आहे. दारिद्रय़रेषेच्या यादीत कुटुंबाचे नाव आहे, असे असतांना केवळ पिवळी शिधापत्रिका नसल्यामुळे संबंधित दुकानदार           स्वस्त धान्य देत  नाही. याशिवाय काही अंत्योदय लाभार्थ्ीनादेखील तेथील दुकानदार पुरेसे धान्य देत नसल्याची व्यथाही काही आदिवासी महिलांनी तहसीलदारांपुढे मांडली. त्याचबरोबर काही स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार             करीत असल्याची तक्रारही या वेळी महिलांनी केली. संतप्त महिलांनी याप्रसंगी अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. महिलांच्या           तक्रारी ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार चंद्रे यांनी आपली नावे पुरवठा शाखेकडे नोंदवा असे आश्वासन दिल्यानंतर या महिला शांत झाल्यात. मात्र जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशीच महसूल प्रशासनास महिलांच्या रोषक पत्करावा लागल्याने याविषयी शहरात एकच चर्चा सुरू आहे. नवीन शिधापत्रिका अथवा नाव कमी करणे, नाव टाकणे यासाठी संबंधित पुरवठा विभागाकडे सतत हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रारही या महिलांनी केली होती. परंतु तरीही कामे होत नसल्याचे सांगितले. कर्मचारी सतत फिरवा फिरव करतात. अजून कार्डवर सही झालेली नाही, उद्या या पर्वा या, अमूक कागद पत्रे जोडा अशा सबबी दाखवून अडवणूक केली जात असल्याची व्यथाही या महिलांनी बोलून दाखविली. वास्तविक आता राईट टू सव्र्हीस हा कायदा शासनाने लागू केलेला असताना येथील पुरवठा शाखेकडून त्याची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे वास्तव या महिलांच्या संतप्त भावनावरून दिसून येते.महसूल प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.बीपीएल लाभार्थी संख्या - 9837अंत्योदय लाभार्थी - 12277एपीएल 25388