शहादा : शहरालगत मलोेणी शिवारात बनावट मद्याचा साठा करुन त्याची विक्र्री करत लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीसांनी १ लाख रुपयांचा मुद्देमाल दोघांकडून जप्त केला़मलोणी शिवारातील हरियाली इस्टेट मधील मोकळ्या जागेत बाभुळाच्या झाडाजवळ बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक पांढऱ्या रंगाच्या वाहनातून दिपक वसंत देवरे रा़ गणेश नगर व साजीद शेख रा़ खेतिया रोड हे दोघेही घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस़एस़शुक्ला यांना मिळाली होती़ यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज सरदार, जलाल शेख, पोलीस नाईक प्रकाश तमखाने, राजेंद्र धनगर, दिपक भाई यांनी याठिकाणी छापा टाकला़ त्यात एमएच १८ इ-०७८३ हे वाहन संशयास्पदरित्या दिसून आले़ पोलीस आल्याचे पाहून चालक साजीद शेख नबू हा घटनास्थळावरुन पसार झाला़ तर संशयित दिपक देवरे यास पोलीसांनी ताब्यात घेतले़ घटनास्थळावर नामांकित मद्याच्या ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या पोलीसांना आढळून आल्या़ रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारु भरुन त्याची विक्री करण्यात येत होती़ पोलीसांनी ८५२ दारुच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे बूच, खोके, एमएच १८ ई ०८५७ हे वाहन आणि ६३० लेबल असा १ लाख ६ हजार ९५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ पोलीस हेड कॉन्स्टेबल जलालुद्दीन शेख यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज सरदार करत आहेत़
मलोणी शिवारात बनावट मद्यविक्रीप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 11:44 IST