शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

सीमावर्ती गावे मुख्य मार्गांनी जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील पाच नवीन मार्गांना मंजुरी दिली आहे. राज्य आणि राष्ट्रीय ...

नंदुरबार : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील पाच नवीन मार्गांना मंजुरी दिली आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे हे रस्ते जिल्ह्याच्या गुजरात व मध्यप्रदेशसह धुळे जिल्ह्याच्या सिमेला लागून आहेत. त्यामुळे दळणवळणाची सुविधा आणखी वाढणार असून यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे.

जिल्ह्याच्या सिमावर्ती भागातील गावांमधून जाणारे व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या काही रस्त्यांचे प्रस्ताव हे केंद्राकडे पाठविण्यात आले होते. त्यातील पाच रस्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. राज्यातील काही रस्त्यांच्या मंजुरीबाबत त्यांनी ट्विट केले असून त्यात जिल्ह्यातील सहा रस्त्यांचा समावेश आहे.

पावला ते ढंढाणे

मंजूर असलेल्या सहा रस्त्यांमध्ये सर्वाधिक खर्चाचा अर्थात नऊ कोटी ९१ लाख रुपये खर्चाचा रस्ता हा नंदुरबार तालुक्यातील पावला ते ढंढाणे-रनाळे असा आहे. राज्यमार्ग नऊपासून निघणारा अर्थात पावला फाटापासून निघून हा रस्ता कोठली, उमर्दे, फुलसरे, पाचोराबारी, टोकरतलाव, नांदरखेडा, चाकळेमार्गे निघून ढंढाणे-रनाळेपर्यंत राहणार आहे. तेथे राज्यमार्ग सहाला जोडला जाणार आहे. याशिवाय हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ७५३ ला अर्थात शेवाळी-नेत्रंग महामार्गाला क्रॅास करून जाणार आहे. नऊ कोटी ९१ लाख रुपये त्यासाठी खर्च अपेक्षित आहे.

करंजवेल ते तिलासर

दुसरा मार्ग हा नवापूर तालुक्यातील आहे. करंजवेल ते तिलासर असा हा मार्ग असून त्यासाठी चार कोटी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग करंजवेल, सुकवेल, डोकारे, बिलबारा, बरडू, केलीमार्गे तिलासरला निघणार आहे. राष्ट्रीय महामार्ग सहाला हा मार्ग क्रॅास करून जोडला जाणार आहे.

रोषमाळ ते कोठार

धडगाव तालुक्यातील रोषमाळ ते कोठार रोड हा राज्यमार्ग आठला जोडला जाणार आहे. जिल्हा सीमेपासून अर्थात रोषमाळ खुर्द, धडगाव मार्गे कोठार असा हा मार्ग आहे. त्याचा खर्च हा चार कोटी ९३ लाख रुपये इतका आहे.

नांद्या ते लांबोळा

शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना जोडणारा नांद्या ते लांबोळा हा मार्गदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. शहादा तालुक्याच्या सीमेवरील नांद्यापासून निघून हा मार्ग कुसूमवाडा, चिखली, धुरखेडामार्गे लांबोळाला निघेल. तेथे तो बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला जोडला जाणार आहे. त्याचा खर्च चार कोटी ९३ लाख रुपये इतका आहे. या मार्गामुळे शहादा शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

सोमावल ते नर्मदानगर तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना जोडणारा व पाच कोटी चार लाख रुपये खर्चाचा हा मार्ग देखील महत्त्वाचा आहे. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गापासून निघून सोमावल ते नर्मदानगर असा राहणार आहे.