शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

बोराळेत गुंजला ‘वंदे मातरम्’चा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:54 IST

शहीद स्मारकाचे लोकार्पण : शहीद मिलिंद खैरनार यांचे कुटुंब गहिवरले

नंदुरबार : वंदे मातरम्, शहीद जवान अमर रहे, शहीद मिलिंद खैरनार अमर रहे.. या घोषणांनी मंगळवारी तापीकाठ दणाणला होता. निमित्त होते बोराळे, ता.नंदुरबार येथे शहीद मिलिंद खैरनार यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या शहीद स्मारक लोकार्पणाचे. अतिशय भावनिक आणि देशप्रेमाने भारावलेल्या या कार्यक्रमाने खैरनार कुटुंब गहिवरले होते.बोराळे, ता.नंदुरबार येथील भारतीय सैन्यातील सशस्त्र अधिकारी मिलिंद किशोर खैरनार हे 11 ऑक्टोबर 2017 रोजी दहशतवाद्यांशी दोन हात करताना काश्मीरच्या सीमेवर शहीद झाले होते. परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांना शहीद मिलिंद खैरनार यांच्या बलिदानाची प्रेरणा लोकांसमोर कायम राहावी या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी त्याचवेळी स्मारक बनविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून या स्मारकाची निर्मिती केली. त्याचे लोकार्पण मंगळवारी सकाळी झाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, प्रीती अभिजित पाटील, शहीद मिलिंद खैरनार यांच्या पत्नी हर्षदा खैरनार, वडील किशोर खैरनार, आई सुनंदा खैरनार व परिवारातील सदस्य उपस्थित होते.स्मारकाचे लोकार्पण करताना त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच हर्षदा खैरनार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बोराळेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तिरंग्याला सलामी देत वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या. सारा आसमंत या घोषणांनी दणाणून सोडला होता. अतिशय देशप्रेमाने भारावलेल्या या सोहळ्याने मिलिंद खैरनार यांचे कुटुंबीय गहिवरले होते.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले की, हे स्मारक गावालाच नव्हे तर जिल्हा आणि राज्याला देशसेवेची प्रेरणा देणारे आहे. त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी त्याची जबाबदारी घ्यावी. शासन खैरनार कुटुंबाच्या पाठीशी आहे. शासन-प्रशासन जे शक्य ते करणारच आहे पण लोकांनी एकत्र येऊन हे स्मारक विकसीत कसे होईल त्याकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन जे काम केले ते खरोखरच कौतुकास्पद असून सर्वासाठीच हे स्मारक प्रेरणादायी ठरणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविकात अल्प काळात हे स्मारक उभारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाच्या व खास करून जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या भक्कम पाठींब्यामुळेच या स्मारकाची निर्मिती झाल्याचे सांगितले.कार्यक्रमास अ.भा. शिंपी समाजाचे अध्यक्ष सुनील निकुंभ, कार्याध्यक्ष रवींद्र बागूल, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भामरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील, प्राचार्य आय.डी. पाटील, बोराळेचे सरपंच पूनमचंद पाटील, उपसरपंच यशवंत भिल, पोलीस पाटील अजय पाटील, अमोल पाटील, भरतसिंग राजपूत, नारायणसिंग राजपूत, शिंपी समाजाचे पदाधिकारी गोपाळराव शिंपी, नितीन बाविस्कर, संजय खैरनार, पुरुषोत्तम शिंपी, सुभाष सावळे, गोकूळ शिंपी, कमलाकर कापडणे, प्रवीण चित्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.  सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार योगेश राजपूत यांनी मानले.