भालेर येथे शासकीय आश्रमशाळेच्या आवारात नवीन वसतिगृहांचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी ठेकेदाराने मोठ्याप्रमाणावर बाहेर गावाहून व परप्रांतीय मजूर आणले आहेत. शनिवारी २६ रोजी सकाळी रखवालदार नरेंद्र पाटील यास कुंपणाच्या पलीकडे एक व्यक्ती पडलेला दिसल्याने तेथे जाऊन पाहणी केली असता घातपाताचा प्रकार लक्षात आला. त्वरित पोलिसांना खबर देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांना एक तरुणव्यक्ती मृत स्वरूपात आढळून आली. या व्यक्तीस मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या. जागेवरच न्यायवैद्यक टीमला पाचारण करून तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी शव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील, शहर ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, योगेश चौधरी, संदीप हिरे, पोलीस पाटील प्रशांत मगरे, तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट दिली.