शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

मंडळाधिकारी व तलाठीत हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 22:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सादर केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे वारंवार नाकारली जात असल्याच्या कारणांवरून टेंभे तर्फे सारंगखेडा येथील तलाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सादर केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे वारंवार नाकारली जात असल्याच्या कारणांवरून टेंभे तर्फे सारंगखेडा येथील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोघांचा वाद मिटविण्यासाठी पोलीसांना पाचारण करावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकाराची सारंगखेडा आणि परिसरात चर्चा रंगली आहे़टेंभे तर्फे सारंगखेडा येथील तलाठी जाधव हे गावातील शेतकऱ्यांची शेती सबंधी प्रकरणे घेऊन सारंगखेडा येथील मंडळाधिकारी जुबेर पठाण यांच्याकडे गेले होते़ मात्र मंडळ अधिकारी पठाण यांनी त्या प्रकरणांचा स्विकार केला नाही़ यातून तलाठी व मंडळधिकारी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. बराच वेळ सुरु असलेला हा वाद हाणामारी पर्यंत पोहोचला होता़ दरम्यान मंडळधिकारी यांनी पोलीसांना फोनवरून माहीती देऊन बोलाूवन घेतले होते़ पोलीस ग्रामपंचायत कार्यालयातील मंडळाधिकारी कक्षात पोहोचल्यानंतर मध्यस्थी करुन हा वाद मिटवण्यात आला़ परंतु हा वाद क्षणिक ठरू नये, तसेच शेतकºयांचे प्रस्ताव अस्विकार करण्यामागच्या कारणांचीही चौकशी व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सारंगखेड्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे़ ग्रामपंचायत कार्यालय परिसर रेड झोन परिसर म्हणून घोषित आहे़ परंतु महसूल विभागातील कर्मचारीच संचारबंदीचे उल्लंघन करतांना दिसून आले़मंडळधिकारी व तलाठी या दोघांचा वाद झाल्याची माहिती मिळाली असून दोघांना तहसील कार्यालयात बोलवून समज दिले जाणार आहे. टेंभे येथील कोणत्या प्रकरणाबाबत वाद होता याबाबत चौकशी करण्यात येईल .-डॉ़ मिलींद कुलकर्णी,तहसीलदार शहादा़