शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात मागील भांडणातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 11:23 IST

नंदुरबार : मागील भांडणाची कुरापत काढत चौघांनी केलेल्या बेदम मारहाणीत 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़ खोडीचा पाटीलपाडा  ता़ अक्कलकुवा येथे रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ रेमा मोत्या वसावे (55) असे मयताचे नाव असून त्यांचा 2012 मध्ये आमश्या पारता वसावे यांच्यासोबत शेतीच्या बांधावरील बांबूचे झाड लावण्यावरून वाद झाला होता़ ...

नंदुरबार : मागील भांडणाची कुरापत काढत चौघांनी केलेल्या बेदम मारहाणीत 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़ खोडीचा पाटीलपाडा  ता़ अक्कलकुवा येथे रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ रेमा मोत्या वसावे (55) असे मयताचे नाव असून त्यांचा 2012 मध्ये आमश्या पारता वसावे यांच्यासोबत शेतीच्या बांधावरील बांबूचे झाड लावण्यावरून वाद झाला होता़ यातून ही खूनाची घटना घडली़ वादाची कुरापत काढून आमश्या पारता वसावे, हिरालाल बावा वसावे, विरजी सोन्या वसावे, बोख्या मोत्या वसावे सर्व रा़ खोडी सारवालपाडा यांनी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रेमा वसावे यांच्या शेतातील खळ्याजवळ येऊन भांडणास सुरूवात केली होती़ यावेळी त्यांच्या हातात लाठय़ा, काठय़ा आणि कु:हाडी होत्या़ यावेळी चौघांनी रेमा वसावे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी त्यांच्या पाठीसह, छातीवर, पायावर कु:हाड उलटी मारून जखमी केल़े रात्री उशिरार्पयत हा प्रकार सुरू होता़ यात गंभीर जखमी झाल्याने पहाटेच्या सुमारास रेमा वसावे यांचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ मोलगी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पी़एऩमेढे व मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे यांनी भेट देत माहिती घेतली़ याबाबत वनसिंग रेमा वसावे यांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून आमश्या वसावे, हिरालाल वसावे, विरजी वसावे, बोख्या वसावे यांच्याविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे करत आहेत़