शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

प्रकाशा येथे १४६ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST

सामाजिक कर्तव्य म्हणून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत ...

सामाजिक कर्तव्य म्हणून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशा, ता. शहादा येथे शिबिर घेण्यात आले. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात झाली. शिबिरात महिला, पुरुष, दिव्यांग व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने १४६ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शिबिरात दिनेश तुकाराम पाटील व श्रद्धा दिनेश पाटील, दिनेश मोहन पाटील व कल्पना दिनेश पाटील आणि संदीप अरुण पाटील यांनी सपत्नीक रक्तदान केले. तसेच याआधी ३० वेळा रक्तदान करणारे सुरेश पूना पाटील व दरवर्षी रक्तदान करणारे प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार शिरसाठ यांनीही रक्तदान केले. या वेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, वि.का. सोसायटीचे अध्यक्ष हरी पाटील, सद्‌गरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, सरपंच सुदाम ठाकरे, धुळे लेवा पाटीदार समाज मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, ग्रा.पं. सदस्य दिलीप ज्ञानदेव पाटील, दिलीप लिमजी चौधरी, किशोर पाटील, मनोज पाटील, प्राचार्य पी.एल. पाटील, नंदकिशोर पटेल, पंडित धनराळे, दशरथ चौधरी, तलाठी डी.एम.चौधरी, प्रकाश चौधरी, रामदास पाटील, सतीश पाटील, सतीश भगवान चौधरी, सुनील पाटील आदी उपस्थित होते.