नंदुरबार : गावात लाईट लावण्यासाठी वर्गणी दिली नाही याचा राग येवून जमावाने एकास बेदम मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना नगाव, ता.नंदुरबार येथे घडली. पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नगाव येथे लाईन बसविण्यासाठी प्रत्येकाकडून २०० रुपये वर्गणी घेतली जात होती. त्याला आत्माराम खंडू पाटील यांनी विरोध केला होता. यातून त्यांचा इतरांशी वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. जमावाने आत्माराम यांना बेदम मारहाण केली तर दोघांनी त्यांच्यावर हात, पाय व डोक्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले.याबाबत आत्माराम खंडू पाटील यांनी फिर्याद दिल्याने प्रशांत सुकलाल पाटील, हर्षल सुकलाल पाटील, सुकलाल पंडित पाटील, वकिल त्र्यंबक पाटील व त्र्यंबक पुंडलीक पाटील सर्व रा.नगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अहिरे करीत आहे.
वर्गणीच्या वादातून जमावाकडून ब्लेडने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:35 IST