लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कहाटूळ ता़ शहादा येथे उसनवारीच्या वादातून एकावर ब्लेडने वार करत मारहाण केल्याची घटना २४ जानेवारी रोजी घडली होती़ याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला़दाजी अर्जुन बिरारे याने सुनंदाबाई ब्रिजलाल बिरारे या महिलेला उधारीने पैसे दिले होते़ २४ रोजी दाजी बिरारे हा पैसे घेण्यासाठी महिलेच्या घरी गेला होता़ याचा राग येऊन सुनंदाबाईसह तिचा मुलगा राकेश आणि निलेश यांनी मारहाण केली़ दरम्यान राकेश याने त्याच्या हातातील ब्लेडने दाजी बिरारे याच्या छाती व पोटावर वार करुन गंभीर दुखापत करुन जखमी केले होते़उपचार पूर्ण केल्यानंतर दाजी बिरारे यांनी सोमवारी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सुनंदाबाई, राकेश व निलेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे़
एकावर ब्लेडने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:00 IST