शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रूसवे फुगवे काढण्यात भाजपाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:28 IST

नंदुरबार लोकसभा निवडणूक : दोन्ही उमेदवार प्रचारात सक्रीय

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघातील भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षातील उमेदवार जाहीर झाल्याने दोघांनी आपापल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. विशेषत: मित्र पक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांच्यातील रूसवे फुगवे काढण्यास भाजपाने आघाडी घेतली आहे.उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत व काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी वैयक्तिक प्रचाराला सुरूवात केली होती. तथापि मध्यंतरीच्या काळात उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने दोन्ही उमेदवारांचा प्रचार थंडावला होता. आता अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोघांनीही प्रचाराला सुरूवात केली आहे. विशेषत: लग्न समारंभ व होळी उत्सवात प्रचारासाठी दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. सध्या सातपुड्यातील होळी उत्सव सुरू आहे. सलग पाच दिवस हा उत्सव सुरू असतो. यासाठी हजारो लोक एकत्र येतात. या शिवाय दुसऱ्या दिवशी मेलादाचा कार्यक्रम होतो. त्या वेळीही लोकांची उपस्थिती असते. त्याचा लाभ घेण्याची संधी भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांनी साधली आहे. तसेच लग्नसराई असल्याने रोज हे उमेदवार लग्नांना हजेरी लावतांना दिसतात.वैयक्तिक प्रचाराबरोबरच रूसवे फुगवे काढण्यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहे. भाजपाची स्थिती पाहता मतदार संघातील आमदार उदेसिंग पाडवी व उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्यातील मतभेद उघड आहे. परंतु निवडणूक काळात डॉ.हिना गावीत यांनी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या निवासस्थानी जावून त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच मित्र पक्ष असलेल्या युतीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतही संयुक्त पत्रकार परिषद घेवून यापूर्वीच निवडणूक काळात एकत्रपणे काम करण्याचे त्यांनी जाहीर केले.काँग्रेसतर्फे मात्र अद्याप आघाडीतील राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संयुक्त चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे उमेदवारी न मिळालेल्या इच्छूक उमेदवारांच्या नाराजी बाबत संभ्रम दूर झालेला नाही. उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी हे वैयक्तिक भेटी गाठी घेत काही नाराज कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबार