शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

परिचरांची बोगस नियुक्तीचेही फुटणार बिंग : अपंग युनिट नियुक्ती प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:49 IST

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग एकात्मक शिक्षण योजना अर्थात अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रमाणेच बोगस परिचर अर्थात शिपाई भरतीचे रॅकेट देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. राज्यभरात याअंतर्गत शासनाने केवळ 32 परिचर भरण्याची यादी दिली असतांना एकटय़ा नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 परिचर भरती करण्यात आले आहेत. त्यामुळे बोगस परिचर ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग एकात्मक शिक्षण योजना अर्थात अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरतीप्रमाणेच बोगस परिचर अर्थात शिपाई भरतीचे रॅकेट देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे. राज्यभरात याअंतर्गत शासनाने केवळ 32 परिचर भरण्याची यादी दिली असतांना एकटय़ा नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 परिचर भरती करण्यात आले आहेत. त्यामुळे बोगस परिचर भरतीचेही बिंग फुटणार असून जिल्हा परिषदेने त्यादृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.अपंग युनिटअंतर्गत तब्बल 71 शिक्षकांच्या नियुक्तीवर शंका घेवून त्यातील बोगस आढळलेल्या 31 जणांवर जिल्हा परिषदेने तडकातडकी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतांना व त्यात शासन, प्रशासनातील अधिकारी, कर्मचा:यांची साखळीसह बाहेरील रॅकेट समोर येत असतांना आता परिचर भरतीचेही बिंग फुटत आहे. यामुळे 23 परिचरांच्या नोकरीवर पुन्हा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.काय आहे प्रकरण..केंद्र शासनाने 2008 साली अपंग एकात्मक शिक्षण योजना लागू केली होती. त्याअंतर्गत माध्यमिक स्तरावर एका युनिटला एक शिक्षक व अपंग विद्याथ्र्याची संख्या जास्त असल्यास एक परिचर भरती करण्यात आले होते. अशा प्रकारे राज्यभरात शेकडो परिचर भरण्यात आले होते. परंतु जेंव्हा केंद्र शासनाने अपंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा नियमात बसणा:या केवळ 32 परिचरांनाच राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये सामावून घेण्याचे शासनाने आदेश दिले होते.2011 साली हे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्याअंतर्गत संबधीत 32 परिचरांना ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदांमध्ये सामावून घेतले गेले आहे.बोगस नियुक्ती आदेशपरिचरांना सामावून घेण्याच्या शासनाच्या आदेशाची मोडतोड करून शिक्षक भरतीतीलच रॅकेटने परिचर भरतीत देखील प्रशासनाला फसवले. प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचा:यांनी देखील त्यांना साथ दिली. परिणामी एकटय़ा नंदुरबार जिल्ह्यातच 23 परिचरांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. हे आदेश खरे की खोटे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. राज्यभरात जर केवळ 32 जणांना सामावून घ्यावयाचे होते तर एकटय़ा नंदुरबार जिल्ह्यात 23 जणांना कसे सामावून घेतले गेले. मुळ यादीत या 23 जणांची नावे आहेत किंवा कसे आदी प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.असे फुटले बिंगअपंग युनिट अंतर्गत बोगस शिक्षक भरतीची शंका मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांना आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. याचअंतर्गत परिचरांचे देखील मोठय़ा संख्येने प्रस्ताव येत असल्याचे व नियुक्ती आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त होत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बिनवडे यांनी त्यादृष्टीनेही तपासाला सुरुवात केली.मुळ यादी किती जणांची व त्यात नावे कुणाची होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या भरतीतही गोलमाल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि बिंग फुटले.गुन्हे दाखल होणारपरिचर भरतीत देखील बोगस नियक्ती आढळून आल्यास संबधीत कर्मचा:यांची सेवा समाप्तीसह त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल होणार आहेत. याशिवाय नियुक्ती प्रक्रियेतील अधिकारी कर्मचारी देखील त्यात गोवले जाणार असल्याच्या शक्यतेमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.