शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यात ट्रॅक्टरवर धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By भूषण.विजय.रामराजे | Updated: May 23, 2023 14:14 IST

रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे इंडिकेटरही बंद असल्याने दुचाकीस्वार अरुण देसले यांना अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट ट्राॅलीवर धडकली होती

नंदुरबार : तालुक्यातील लहान शहादा गावाजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीवर मोटारसायकल धडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान घडली. याप्रकरणी पोलीसात नियमबाह्य पणे ट्रॅक्टर उभे करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण नानासाहेब देसले (४३) रा.जोगशेलू ता. शिंदखेडा ह.मु. हेमंत नगर, नंदुरबार असे मयताचे नाव आहे. अरुण देसले हे रात्री जीजे ०६ एमपी ३८०५ या मोटारसायकलीने प्रकाशाकडून नंदुरबारकडे येत होते. दरम्यान लहान शहादे गावातील महामार्गावर एमए९ ३९ व्ही ४८५६ हे ट्रॅक्टर ट्राॅलीसह अत्यंत बेशिस्त पद्धतीने उभे करण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे इंडिकेटरही बंद असल्याने दुचाकीस्वार अरुण देसले यांना अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट ट्राॅलीवर धडकली होती. यातून अरुण देसले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असता, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी समाधान भटू पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन एमएच ३७ व्ही ४८५६ वरील ट्रॅक्टर चालकाविरोधात अपघात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे करत आहेत.