शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार, विनाकारण फिराल तर थेट गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक गावात फेरफटका मारतात. परिणामी गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत असल्यामुळे पोलिसांनी सक्तीने कारवाईला सुरुवात केली आहे. शहर वाहतुक शाखेने दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली आहेत. तर एक लाखाच्या वर दंड वसुल करण्यात आला आहे. शहर, उपनगर व तालुका पोलिसांतर्फे देखील बाहेर फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करीत आहेत.संचारबंदी काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत आहेत. यामुळे शासनाचा लॉकडाऊनचा उद्देशाला हारताळ फासला जात आहे. प्रशासनाने बाजाराचे अलगीकरण करून देखील नागरिक आपल्या परिसरात खरेदी करण्याऐवजी शहरातच येत आहेत. काही जण विनाकारण फेरफटका मारण्यासाठी शहरात येत आहेत. नागरिकांना आवाहन करून देखील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आता थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.१७५ वाहने जमापोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेला याबाबत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विनाकारण शहरात वाहने येत असल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सकाळी १० वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर थेट वाहने जमा केली जात आहेत. दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली. जमा केलेली वाहने दंड भरून सोडली जात आहेत. त्यात पीयूसी, नंबर प्लेट, साईड ग्लास, रजिस्ट्रेशन, चालविणाºयाचे लायसन्स यासह इतर बाबी पाहिल्या जात आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून तो एकत्रीत दंड वसुल केला जात आहे. १७५ पैकी ९५ जणांनी आतापर्यंत या प्रकारचे दंड भरून वाहन सोडविले आहेत.एक लाखापेक्षा अधीक दंडवाहन जमा करण्यासह आॅनलाईन दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. आतापर्यंत दोन दिवसात एक लाखापेक्षा अधीक दंड वसुल करण्यात आला आहे. दंड हा आॅनलाईन आहे.एक अधिकारी ४० कर्मचारीकारवाईसाठी एक अधिकारी व ४० कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. शहरातील चारही चौफुली, मुख्य रस्ते, उड्डाणपूल या ठिकाणी पॉर्इंट लावण्यात आले आहेत. तेथे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह शहर व उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात आहेत.शहरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाºया सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांची चांगलची दहशत निर्माण झाली आहे. शहर वाहतुक शाखेतर्फे देखील दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अधाटे यांच्यासह त्यांच्या ४० कर्मचाºयांचे पथक यासाठी कार्यान्वीत आहेत. शहर वाहतूक शाखेच्या जोडीला शहर पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात करण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी चालकांचे शहरात येण्याचे प्रमाण कमालची रोडावले आहे.