मिठाईच्या ताटात बेस्ट बिफोरचे स्टीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:44 PM2020-10-17T12:44:49+5:302020-10-17T12:44:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एफएसएसएआय अर्थात फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडडर्स अथाॅरीटी  ऑफ इंडियाने देशात मिष्ठान्न किंवा मिठाईबाबत नवीन ...

Best Before sticker on dessert tray | मिठाईच्या ताटात बेस्ट बिफोरचे स्टीकर

मिठाईच्या ताटात बेस्ट बिफोरचे स्टीकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एफएसएसएआय अर्थात फूड सेफ्टी ॲण्ड स्टँडडर्स अथाॅरीटी  ऑफ इंडियाने देशात मिष्ठान्न किंवा मिठाईबाबत नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार नंदुरबार शहरातील बहुतांश मिठाई विक्रेते काम करत असून कोणती मिठाई किती दिवस टिकेल याची माहिती थेट काऊंटरवर लिहून ठेवली जात आहे. 
लोकमतने एफएसएसएआयने घोषित केलेल्या नियमावलीनुसार शहरातील पाच दुकानांमध्ये चाैकशी करुन माहिती घेतली असता, दुकानदार आणि ग्राहक यांना याची माहिती असल्याचे समोर आले. मावा, रवा, लिक्विड मिष्ठान्न तसेच बेसन पीठापासून तयार प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर एक चकती ठेवून बेस्ट बिफोर अर्थात मिठाई किती दिवस टिकून राहणार राहिल याची माहिती देत आहेत.  दोन ते चार दिवस टिकणारी मिठाई योग्य असल्याने तिच खावी असा आग्रहही करत आहेत. दिवाळीपर्यंत सर्वच ठिकाणी स्टीकर दिसणार 
दरम्यान शहरातील वातावरणानुसार रबडी, बासुंदी असे दुग्धजन्य द्रव मिठाई, श्रीखंड, रसमलाई असे प्रकार साधारण २४ तास, मावा मिठाई, पेढा आदी मिठाई दोन दिवस तर बेसनपीठापासून तयार होणारी मिठाई पाच दिवसांपेक्षा अधिक काळ टिकत नसल्याने त्या अनुषंगाने लागेल तेवढी मिठाई विक्री करत असल्याची माहिती देण्यात आली. मिठाई घेण्यासाठी आलेल्या काही ग्राहकांसोबत चर्चा केली असता, शासनाने काढलेला नियम चांगला असून यातून दूषित किंवा खराब मिठाईमुळे होणारा त्रास कमी होणार असल्याचे सांगितले. ग्राहकांना या प्रकाराची माहिती नसल्यास मिठाई विक्रेते माहिती करुन देत असल्याचेही यावेळी दिसून आले. दरम्यान शहरातील सर्व छोट्यामोठ्या दुकानांमध्ये दिवाळीपर्यंत मिठाईवर स्टीकर ठेवूनच व्यवसाय करणार असल्याची माहिती देण्यात आली. काही दुकानात मात्र स्टीकर ठेवण्यात आलेले नसल्याने त्याठिकाणी कारवाई करण्याची गरज आहे. विक्रेत्यांची बैठक 
शहरातील सुभाष चाैक, नेहरू चाैक, गिरीविहार, सीबी पेट्रोलियम येथील पाच मिठाई विक्रीच्या दुकानांना भेटी दिल्या असता, ४ ऑक्टोबरपासून बेस्ट बिफोर असे स्टीकर मिठाईवर लावले जात असल्याचे सांगण्यात आले. शहरातील मिठाई व्रिक्रेता संघटनेने यापूर्वी बैठक घेवून सर्वांना सूचित केल्याची माहिती देण्यात आली. उर्वरीत विक्रेते अंमलबजावणी करत असल्याचे सांगण्यात आले.  शहरातील सर्व विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मिठाईवर ती किती दिवस टिकू शकेल याची माहिती देणारे स्टीकर लावले आहे. ग्राहकांनाही माहिती देत आहोत. नियमांचे पालन करण्यावर भर राहिल. 
-पप्पूजी अग्रवाल, मिठाई व्रिक्रेते, नंदुरबार. 

Web Title: Best Before sticker on dessert tray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.