शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीवेळी ग्रामस्थांवर मधमाशांनी चढवला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : मोठे कडवान ता़ नंदुरबार येथे मयत महिलेच्या दफनविधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : मोठे कडवान ता़ नंदुरबार येथे मयत महिलेच्या दफनविधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला चढवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ मधमाशांनी तीव्रतेने चावा घेतल्याने काही जण जखमी झाले होते़ त्यांना खांडबारा ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़लक्ष्मीबाई सखाराम वळवी रा़ मोठे कडवान यांचे निधन झाल्याने ग्रामस्थ त्यांच्या अंत्यविधीसाठी सोमवारी सकाळी एकत्र झाले होते़ गावातील दफनभूमीत त्यांचा अंत्यविधी होणार असल्याने ग्रामस्थ त्याठिकाणी जमले होते़ याच दरम्यान या परिसरातील मधमाशांनी चावा घेण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांची पळापळ झाली़ मधमाशा पाठलाग करत असल्याने मिळेल त्या वाटेने पळत सुटले होते़ हातपायासह चेहऱ्यावर मधमाशांनी चावा घेतल्याने वृद्ध जखमी झाले़ सरपंच बंधू पाच्या वळवी यांच्यासह ग्रामस्थांनी यावेळी सावध पवित्रा घेत ग्रामस्थांना पळापळी न करण्याच्या सूचना केल्या़ परंतू मधमाशा पूर्णपणे चवताळल्याने गोंधळ वाढत होता़ मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून उपचार घेत जखमी घरी परतल्याची माहिती आहे़

हा प्रकार सुरु असताना लक्ष्मीबाई वळवी यांचा मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता़ दुपारी विसरवाडी येथून जेसीबी मागवून ग्रामस्थांनी अंत्यविधी पूर्ण करुन घेतला़ यावेळी मधमाशा घोंगावत असल्याने लांबूनच धार्मिक विधी पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले़