लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील दुस:या क्रमांकांचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटक हजेरी लावून ‘वर्षा पर्यटना’चा आनंद लुटत आह़े शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे येथे पर्यटकांची गर्दी झाली होती़ तोरमणमाळ येथे पावसाळ्यात निसर्गसौंदर्य खुलत असल्याने जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पर्यटकांचा वावर असतो़ यंदा पावसाने उशिरा हजेरी दिल्याने जुलैमध्यार्पयत पर्यटक या भागात फिरकले नव्हत़े परंतू गत दोन आठवडय़ापासून सातपुडय़ात मुसळधार पाऊस होत आह़े यातून तोरणमाळ आणि परिसरातील निसर्ग हिरवागार होऊन लहान मोठे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत़ परिणामी तोरणमाळला वर्षा पर्यटनासाठी येणा:या हौशी पर्यटकांची गर्दी वाढत होती़ यातच शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवस सुटी असल्याने पर्यटकांची गर्दी झाल्याचे दिसून आल़े सिताखाई, यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथ गुफा, गोरक्षनाथ मंदिर यासह ठिकठिकाणी पर्यटक हजेरी लावून पावसात फिरण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसून आले आह़े पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे तोरणमाळ येथील छोटय़ामोठय़ा व्यवसायांना गती आली असून खाद्यपदार्थ विक्रेते आणि निवास व्यवस्थेचे व्यवसाय तेजीत आल्याची माहिती देण्यात आली आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात पाऊस कोसळत असल्याने छोटे ओढे व नाले भरुन वाहू लागल्याने यशवंत तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आह़े तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिताखाई धबधबा ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने अनेक जण हा क्षण टिपण्यासाठी येथे मुक्कामी थांबून असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील पर्यटक याठिकाणी हजेरी लावत असल्याने सातपायरी घाटात दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसून येत आहेत़ पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दिवसात पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आह़े
पर्यटकांसोबतच गत दोन दिवसात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही भेटी दिल्याची माहिती आह़े येथील वनविभागाचे विश्रामगृह आणि खाजगी हॉटेल्समध्ये पर्यटकांची समाधानकारक स्थिती असल्याचे दिसून आले होत़े पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलीस दल आणि आरोग्य विभागाने येथे कर्मचा:यांना सतर्कता बाळगून सेवा पुरवण्याचे सांगितले आह़े एसटी महामंडळाकडूनही मिनीबसेस सुरु करण्यात आल्याने युवा वर्गाची मोठी गर्दी दिसून येत आह़े यशवंत तलाव परिसरात भटकंती करणा:यांची संख्या वाढत आह़े रविवारी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचा अनुभव स्थानिकांना आला़
तोरणमाळ मंडळात जुलैअखेरीस 82़.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आह़े जून महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे मंडळातील सर्वच गावांत हिरवळ दाटून आल्हादायक वातावरण निर्माण झाले आह़े