लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची वाढती संख्या आणि उपलब्ध बेडची संख्या यांचा ताळमेळ बसणे आता जिकरीचे होऊ लागले आहे. याशिवाय बाधीतांना किंवा संशयीतांना कोविड उपचार कक्षात किंवा क्वॉरंटाईन सेंटरमध्ये राहावे लागते. परिणामी अनेकजण स्वॅब चाचणी करून घेत नाहीत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने बाधीत असलेले परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता घरीच उपचार घेता येणार आहेत. त्यासाठी मात्र काही अटी व नियम घालून देण्यात आले आहेत.गृह अलगीकरणासाठी रुग्णांची पात्रता वैद्यकीय पडताळणीअंती लक्षणे नसणाऱ्या बाधित रुग्णांवर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकाºयाने प्रमाणीत केल्यास गृह अलगीकरणास अनुमती देण्यात येईल. त्यासाठी रुग्णांच्या घरामध्ये स्वतंत्र स्नानगृह व शौचालयाची सुविधा उपलब्ध असावी व संपर्कात येणाºया परिवारासाठी विलगीकरणाची पुरेशी सुविधा असावयास हवी. गृह अलगीकरण रुग्णाने आपल्या घराच्या दर्शनी भागावर लाल रंगाने कोविड-१९ गृह अलगीकरण दिनांक पासून ते दिनांक पर्यंत अशा आशयाची पाटी लावणे बंधनकारक राहील. चोवीस तास कालावधीसाठी काळजी घेणारी व्यक्ती असणे बंधनकारक असेल. गृह विलगीकरणाच्या संपुर्ण कालावधीत काळजीवाहू व्यक्ती व कोविड हॉस्पिटल यांच्यात कायम संपर्क असणे बंधनकारक असेल.वैद्यकीय अधिकाºयाने सुचविल्यानुसार विहित पद्धतीनुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कात असणाºया सर्व व्यक्तींनी हायड्रॉक्सील क्लोरोक्विन औषध घेणे बंधनकारक राहील. रुग्णाने आरोग्य सेतू अॅप मोबाईलवर डाऊनलोड करणे आणि संपूर्ण कालावधीत ब्ल्यूटूथ व वायफायद्वारे कार्यान्वीत ठेवणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तीने तालुका कंट्रोल रुम तसेच स्थानिक आरोग्य तपासणी टीम यांच्याशी दिवसातून तीन वेळा संपर्क साधुन आपल्या आरोग्याच्या सद्यस्थिती बाबत माहिती देणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तीने विहीत नमुन्यातील हमीपत्र भरुन देणे व नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या दैनंदीन आरोग्य तपासणी बाबत असलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होत असल्याबाबत घटना व्यवस्थापक यांनी पडताळणी करुन तसा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
रोग प्रतिकार शक्तीचा अभाव असणाऱ्या रुग्णांना (एचआयव्ही, ट्रान्सप्लांट रेसिपिएंट, कॅन्सर थेरेपी आदी) गृह विलगीकरणात राहण्याची मुभा उपलब्ध नसेल. ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेले रुग्ण तसेच इतर आजार (उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्दय विकार, फुफ्फुस, जठर, मुत्रपिंड विकार, सेरेब्रो-व्हास्कुलर इत्यादी जुनाट आजार) असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची मुभा नसेल.४गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींचे दररोज आरोग्य स्थिती पडताळण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांची राहील. प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय स्थिती उदा. शारीरिक तापमान, पल्स रेट आणि आॅक्सीजनचे प्रमाण नोदवण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाची राहील. रुग्णांना वरील बाबींची तपासणी कशी करावी याबाबत क्षेत्रीय व संनियंत्रण पथकाने मार्गदर्शन करावे.
लक्षणे निदर्शनास आल्याच्या दहाव्या दिवसानंतर आणि तीन दिवस सलग ताप नसल्यास संबंधित रुग्णांचे गृह अलगीकरण समाप्त झाले आहे असे समजावे. त्यानंतर पुढील सात दिवस संबंधित रुग्णाने घरीच विलगीकरणात राहावे आणि स्वत:च्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवावे. गृह अलगीकरण कालावधी समाप्त झाल्यानंतर चाचणी करण्याची आवश्यकता नाही. जे रुग्ण उपरोक्त अटी व शर्तींचा भंग करतील अशा रुग्णांवर साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.