लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कानळदा, कोळदे, पळाशी, समशेरपुर, खोंडामळी, बह्याणे-मांजरे, पातोंडा आदी परिसरातील गाव विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़या परिसरातील विहिरींची पातळी खोल गेल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे़ काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी विहिरीत मोटारीदेखील सोडल्या होत्या़ परंतु त्यासुध्दा पाणी ओढणे शक्य होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़परिसरात आता पपई, कापूस, सोयाबिन आदी पिके घेण्यात येत आहेत़ त्यामुळे त्यांना जगविण्यासाठी पाण्याची सोय आवश्यक आहे़ परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे़ पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे़पुढील पावसाळा लांबला तर परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत़दरम्यान, ठिबकमुळे बागायतदार शेतकरी तरले असले तरी कोरडवाहू शेतकºयांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे़ ठिबक सिंचनावर केळी, पपई आदी पिके घेण्यात आलेली आहेत़ परंतु यंदा पाण्याची कमतरता असल्याने पिकांची लागवड यंदा कमीच राहिल असे जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़
कानळदा परिसरातील विहिरींनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:07 IST