परराज्यातील वाळू वाहतुकीला जिल्हा हद्दीतील रस्त्यांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:52 AM2020-06-07T11:52:19+5:302020-06-07T11:52:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळुची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील ...

Ban on foreign sand transport on district boundary roads | परराज्यातील वाळू वाहतुकीला जिल्हा हद्दीतील रस्त्यांवर बंदी

परराज्यातील वाळू वाहतुकीला जिल्हा हद्दीतील रस्त्यांवर बंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळुची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्ह्यांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले आहे.
जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून नंदुरबारमार्गे इतर भागात वाळू वाहतूक सुरू आहे. या भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून, शासनाकडून हे जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. रेती किंवा वाळू वाहतुकदारांमुळे करोना विषाणुचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वाळू वाहतुकदारांकडून चेहऱ्याला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक जागेवर न थुंकणे, पान, तंबाखू, गुटखा सेवन व मद्यप्राशन न करणे आदी निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय वाळू वाहतुकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था होत आहे.
वाहू वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतुकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा ते नंदुरबार मार्गावर वाळू वाहतुकदारांनी रूग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. याबाबी लक्षात घेता वाळू वाहतुकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, मुंबई पोलीस अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यानुसार वरील आदेश देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरिता हा आदेश लागू राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा संघटना कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील.

Web Title: Ban on foreign sand transport on district boundary roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.