नंदुरबार : खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यावर रविवारी धुळे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्र्याकडून झालेल्या हल्याचे पडसाद नंदुरबारात दुस:या दिवशीही उमटल़ेनंदुरबारसह खांडबारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ खबरदारी म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अधिकचा फौजफाटा लावण्यात आला आह़ेधुळे येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जात असताना खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या वाहनावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्र्याकडून हल्ला करण्यात आला होता़ त्यानंतर रविवारपासूनच याचे पडसाद नंदुरबारात उमटण्यास सुरुवात झाली होती़ रविवारी रात्री सर्व ठिकाणची दुकाने बंद करण्यात आली होती़ नवापूरात चक्काजाम आंदोलन करण्यात आल़े घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस प्रशासनाकडून नंदुरबार शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता़ सोमवारी सकाळपासूनच नंदुरबार, नवापूर व खांडबारा येथे तणावपूर्ण शांतता होती़ नंदुरबारात कडकडीत बंद पाळण्यात आला असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता़ शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलेली होती़ नंदुरबारात चौका-चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता़ कार्यकर्ते गटागटाने बंदचे आवाहन करत होत़े दरम्यान, या घटनेच्या सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी निषेध केला आह़े
खासदारांवरील हल्याच्या निषेधार्थ नंदुरबारात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 11:56 IST