डोकारे ते बिलदापर्यंत डांबरीकरण रस्ता प्रचंड खराब झाला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोटरसायकल चालविणे मोठे जिकिरीचे जात आहे. साईडपट्टीने मार्गस्थ होण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. डोकारे गावाजवळील रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. चिखली फाट्याजवळील रस्त्यावर चालणे मुश्किलीचे जात आहे. अंजने गावाजवळीलदेखील रस्ता खराब झाला आहे.
अंजनेपासून ते बिलदापर्यंत रस्त्यावरदेखील खड्डे पडले आहे. ठिकठिकाणी रस्ता खचून गेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी डबके तयार होतात. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात. संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी धायटा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील ग्रामस्था आठवडे बाजार करण्यासाठी शुक्रवारी चिंचपाडा, शनिवारी नवापूर, रविवारी खांडबारा येथे जात असतात. रस्ता खराब असल्याने मोठे हाल होत आहे. तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धायटा परिसरातील आदिवासीबहुल ग्रामस्थांनी दिला आहे.