शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकाधिकार खरेदी केंद्रांकडे पाठ : अवघी दिडशे क्विंटल तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकाधिकार तूर खरेदीला शेतक:यांकडून अद्यापही अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारातील केंद्रात केवळ 148 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातून अद्याप एकही शेतकरी तूर विक्रीसाठी आलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या बाजारात एकाधिकारी खरेदी केंद्रापेक्षा 200 ते 300 रुपये जादा भाव मिळत असल्याने शेतक:यांचा त्याकडे कल आहे.नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा येथे एकाधिकार तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही केंद्रांना प्रत्येकी तीन तालुके जोडण्यात आली आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या केंद्रांना शेतक:यांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तीन तालुके मिळून एकच खरेदी केंद्र असल्यामुळे शिवाय ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्यामुळे प्रतिसाद कमी असल्याचेही दिसून येत आहे.यंदा 16 हजार हेक्टरतुरीचे क्षेत्र यंदा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढले होते. सरासरी क्षेत्र 15 हजार हेक्टर्पयत आहे. परंतु दरवर्षी 12 ते 14 हजार हेक्टर्पयत क्षेत्र असते. यंदा ते 16 हजार 400 हेक्टर्पयत गेले होते. एकटय़ा नवापूर तालुक्यात तब्बल आठ हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते. गेल्या तीन ते चार वर्षापासून तुरीला मोठय़ा प्रमाणावर भाव मिळत असल्यामुळे यंदा क्षेत्र वाढल्याचे सांगण्यात आले. यंदा पजर्न्यमान चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले मिळाले. परंतु भाव कमी मिळाल्याने शेतक:यांमध्ये काही प्रमाणात नाराजीही राहिली.एकाधिकार खरेदी केंद्रतुर खरेदीसाठी एकाधिकारी खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर नाफेडअंतर्गत तुरीची खरेदी करण्यासाठी शेतकरी संघामार्फत एकाधिकार खरेदी केंद्र नंदुरबारात सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. खरेदी केंद्रामुळे शेतक:यांना ते सोयीचे होईल अशी अपेक्षा होती. परंतु ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे शेतक:यांनी या झंझाटातून बाहेर राहणेच पसंत केले. खरेदी केंद्रात तूर आणतांना मालाची आद्रता 12 टक्के एवढी पाहिजे. तूर विक्रीसाठी आणतांना सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकचे पासबूक आदी कागदपत्रे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीसाठी आणणे शेतक:यांना बंधनकारक करण्यात आले आहे.वाहतूक खर्च परवडेनासाएका खरेदी केंद्राला तीन तालुके जोडण्यात आल्यामुळे एवढय़ा लांबून तूर विक्रीसाठी आणण्याचा खर्चच शेतक:यांना न परवडणारा आहे. अक्कलकुवा ते नंदुरबार किंवा नवापूर ते नंदुरबार इतक्या अंतराचा मालवाहतुकीचा खर्च परवडणे शेतक:यांना शक्य नाही. शिवाय भाव देखील कमी मिळत असल्यामुळे शेतक:यांचा कल सध्यातरी खरेदी केंद्रांकडे नसल्याचे चित्र आहे.