शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

मोलगी दूरसंचार कार्यालयाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : मोलगी येथे बीएसएनएल रेंजअभावी अनेक कामे रखडत आहे. ग्राहकांना संपर्काची सेवाच मिळत नसल्याने संतप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : मोलगी येथे बीएसएनएल रेंजअभावी अनेक कामे रखडत आहे. ग्राहकांना संपर्काची सेवाच मिळत नसल्याने संतप्त ग्राहकांनी मोलगी ता. अक्कलकुवा येथील बीएसएनएलच्या कार्यालयालाच टाळे ठोकले. परंतु दोन दिवसात सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांमार्फत कार्यालय पुन्हा उघडण्यात आले.अवघ्या देशात डिजिटल इंडियाचे वारे वाहत असले तरी धडगाव व मोलगीचा भाग त्याला अपवाद ठरत आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या सेवेचा सामना करीत असतांनाच दोन आठवड्यापासून मोलगी टॉवरमार्फत दिली जाणारी सेवा पूर्णत: कोलमडली, सर्व आॅनलाईन कामे अनेक दिवसांपासून ठप्प झाली आहे. महत्वाची कामे पुढे करीत नर्मदा काठ व सातपुड्याच्या दºया खोºयातील मैलोची पायपीट करीत नागरिक मोलगी येथे येत आहे परंतु बीएसएनएलची सेवाच बंद पडल्यामुळे त्यांची कामे होत नाही. त्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागत आहे.दुरसंचारच्या भोंगळ कारभार व सेवेमुळे संतप्त नागरिकांनी मोलगी कार्याललयालाच टाळे ठोकले. यावेळी भाजपाचे सुनिल राहसे जिगर पाडवी, बलवंत वसावे, शिरीष वसावे, राजा अहिरे, अशोक वसावे, चुन्नू सय्यद, राजू परदेशी, गोकुळ भारद्वाज, बंटी पाटील, किशोर अहिरे या ग्रामस्थांनी कुलुप ठोकले. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दोन दिवसात सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कार्यालय पुन्हा उघण्यात आले.